आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आस्क मी:काजोलने ट्विटरवर चाहत्यांसोबत मारल्या गप्पा, म्हणाली - शाहरुखचा उत्साह, ऊर्जा मला सर्वात जास्त आवडते 

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आस्क मी सेशनदरम्यान काजोलने अजय देवगण आणि शाहरुख खानशी संबंधित प्रश्नांची उत्तरे दिली.

लॉकडाऊनच्या काळात अनेक कलाकार सोशल मीडियावर आस्क मी सेशनच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्क करत आहेत. यादरम्यान अभिनेत्री काजोलनेही प्रयत्न करुन तिच्या चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली... 

  • तुझी आवडती भूमिका कोणती?

माझे सर्वांत आवडते पात्र‘कुछ कुछ होता है’ मधील अंजली आहे.

  • अभिनेत्री नसतीस तर काय व्हायचे होते?

आज जी काही आहे त्यातील थोडे थोडे सर्वच असते.

  • लॉकडाऊनमध्ये अजयने तुझ्यासाठी कितीदा स्वयंपाक केला ?

मी बरेचदा म्हणाले पण तो किचनमध्ये जायला तयारच झाला नाही.

  • शाहरुख खानची कोणती गोष्ट जास्त आवडते?

त्याच्यातील उत्साह, ऊर्जा मला सर्वांत जास्त आवडते.

  • कोणाला तुझ्यासारखे बनायचे असेल तर काय सांगशील?

बॉलिवूडमध्ये येणाऱ्यांना एकच सल्ला देईल की, बॅकअप म्हणून नेहमी एक पर्याय ठेवावा.

  • 2020 मधील सर्वांत चांगली गोष्ट?

2020 संपण्यासाठी फक्त 7 महिनेच शिल्लक आहेत. 

बातम्या आणखी आहेत...