आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काजोलने घेतले लालबागच्या राजाचे दर्शन:पिवळ्या रंगाच्या साडीत दिसली अतिशय सुंदर, एलिगंट लूक बघून चाहते झाले इम्प्रेस

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री काजोल लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचली होती. ज्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये काजोल पिवळ्या रंगाच्या साडीत अतिशय सुंदर दिसत आहे. तिने केसात गजरा माळला आहे. व्हिडिओमध्ये काजोलचा लूक खूपच सुंदर दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते तिच्या लूकचे कौतुक करत आहेत.

श्रीगणेशाची प्रार्थना करत काजोलने बाप्पांचा आशिर्वाद घेतला.
श्रीगणेशाची प्रार्थना करत काजोलने बाप्पांचा आशिर्वाद घेतला.
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी काजोलने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती.
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी काजोलने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती.
बाप्पाचे दर्शन घेताना काजोल
बाप्पाचे दर्शन घेताना काजोल
प्रचंड गर्दी असतानाही काजोलने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
प्रचंड गर्दी असतानाही काजोलने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.

काजोलने देखील तिच्या या लूकचा एक व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

बातम्या आणखी आहेत...