आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाने हिरावला अभिनेता:'काला' आणि 'असुरन' फेम अभिनेता नितीश वीरा यांचे कोरोनामुळे निधन, धनुषसह कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सेलिब्रिटींनी व्यक्त केला शोक

तामिळ अभिनेता नितीश वीरा यांचे निधन झाले आहे. ते 45 वर्षांचे होते. मुळचे मदुराईचे असलेले नितीश यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. चेन्नईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्च्यात कुटुंबात त्यांच्या दोन मुली आहेत. असुरन या चित्रपटात नितीश यांचा को-स्टार राहिलेला अभिनेता धनुषने सोशल मीडियावर त्यांचा एक फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सेलिब्रिटींनी व्यक्त केला शोक
लेखक श्रीधर पिल्लई यांनी नितीश यांच्या निधनाची बातमी दिली होती. कोरोनामुळे त्यांचे निधन झाल्याचे पिल्लई यांनी सांगितले होते. नितीश यांनी विजय सेतुपती आणि श्रुती हासन स्टारर 'लाबम' या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यांच्या निधनाने तामिळ चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

बातम्या आणखी आहेत...