आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाशी लढा:कमल हासन यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी विचारले - दुसरे मुख्यमंत्री लॉकडाऊनबाबत स्वतः निर्णय घेत आहेत, आपण कशाची वाट पाहात आहात?

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कमल हासन यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना केले निर्णय घेण्याचे आवाहन.

5 राज्यांनी देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनचा कालावधी वाढविला आहे. इतर बरीच राज्येही याच विचारात आहेत. अशा परिस्थितीत, तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत कमल हासन यांनी एक ट्विट केले ज्यामध्ये त्यांनी तामिळनाडूमधील लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली आहे. दरम्यान, केरळ पोलिसांनी कमल हासन यांचे एका पत्राद्वारे आभार मानले आहेत.

मुख्यमंत्र्यांना केले निर्णय घेण्याचे आवाहन: कमल हासन यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे- जेव्हा इतर राज्यांचे मुख्यमंत्री आपल्या राज्यात लॉकडाऊनचा निर्णय घेत आहेत. तर माझे माननीय मुख्यमंत्री, तुम्ही कशाची वाट पाहात आहात? आपण आवाज का काढत नाही? माझा आवाज जनतेच्यावतीने उठला आहे. आपण अजूनही आपल्या खुर्चीवर आहात, जागे व्हा सर.केरळ पोलिसांचे केले होते कौतुक : यापूर्वी,

राज्य पोलिस प्रमुख केरळ आयपीएस लोकनाथ बहेरे यांनी हे पत्र जारी केले आहे.
राज्य पोलिस प्रमुख केरळ आयपीएस लोकनाथ बहेरे यांनी हे पत्र जारी केले आहे.

केरळ पोलिसांचे केले होते कौतुक : यापूर्वी, एका पोलिस कर्मचा-याचा व्हिडिओ शेअर करताना कमल यांनी लिहिले होते - “उत्कृष्ट... केरळ पोलिस मला आनंद आहे की, वर्दीतल्या एका पोलिसाकडडे गायन प्रतिभाही आहे. मी एक संवेदनशील आणि विचारवंत कल्पना घेऊन आल्याबद्दल पोलिस खात्याच्या उच्च अधिका-यांचे अभिनंदन करतो." सलाम."

बातम्या आणखी आहेत...