आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा सुरु झाले 'इंडियन 2'चे चित्रीकरण:2 वर्षांपासून रखडले होते काम, कमल हासन म्हणाले - एका चित्रपटासाठी आम्ही...

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कमल हासन यांच्या बहुप्रतिक्षित इंडियन 2 या चित्रपटाचे शूटिंग पुन्हा एकदा सुरु होत आहे. सोशल मीडियावर एक पोस्टर रिलीज करत निर्मात्यांनी ही माहिती दिली आहे. चित्रपटाची उर्वरित दृश्ये 1 सप्टेंबरपासून शूट केली जातील. 2 वर्षांपासून चित्रपटाचे काम रखडले होते, त्यामुळे निर्मात्यांना मोठा फटका बसला होता. मात्र, पुन्हा एकदा चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे.

ट्विटरवरद्वारे दिली माहिती

23 ऑगस्ट रोजी आपल्या ट्विटर हँडलवर शूटिंग सुरू झाल्याची माहिती देताना, चित्रपट निर्माते शंकर म्हणाले- 'आम्हाला तुम्हाला कळविण्यात आनंद होत आहे की, इंडियन 2 चित्रपटाचे उर्वरित शूटिंग 2 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ज्यासाठी आम्हाला सर्वांच्या पाठिंब्याची गरज आहे.'

देसी अंदाजात दिसतील कमल
कमल हासन यांच्या लूकची बरीच चर्चा आहेत. यात ते सफेद शर्टमध्ये दिसत आहेत. याआधी त्यांचा खाकी लूक प्रेक्षकांना खूप भावला होता.

सेटवर झालेल्या अपघातामुळे थांबवण्यात आले होते शूटिंग
खरंतर, फेब्रुवारी 2020 मध्ये शूटिंगदरम्यान सेटवर झालेल्या अपघातामुळे चित्रपटाचे शूटिंग थांबवावे लागले होते. हिंदुस्तान टाईम्सच्या बातमीनुसार, 'या अपघातात चित्रपटाच्या सेटवर असलेल्या 3 जणांचा मृत्यू झाला होता, तर 10 जण जखमी झाले होते. त्यानंतर चित्रपट पूर्ण होणार नसल्याच्या बातम्या देखील आल्या होत्या, परंतु आता चित्रपट निर्माते शंकर यांनी पुष्टी केली आहे की चित्रपटाचे शूटिंग 2 सप्टेंबरपासून सुरू होत आहे.'

वेगवेगळ्या ठिकाणी झाले चित्रपटाचे शूटिंग
इंडियन 2 ची शूटिंग देशात आणि जगातील वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आली आहे. चित्रपटाचे अनेक सीक्‍वेन्स भोपाळ शहरात शूट करण्यात आले आहेत, याशिवाय चित्रपटाचे काही सीक्‍वेन्स तैवानमध्ये शूट करण्यात आले आहेत. या चित्रपटाचे अॅक्शन सिक्वेन्स राष्ट्रीय पुरस्कार विजेते स्टंट कोरियोग्राफर पीटर हेन यांनी कोरिओग्राफ केले आहेत, त्यामुळे चित्रपटात जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.

चित्रपटात कमल हासनशिवाय सिद्धार्थ, काजल अग्रवाल, रकुल प्रीत सिंग, बॉबी सिम्हा, प्रिया भवानी शंकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटातील अनेक दृश्यांचे चित्रीकरण झाले आहे, त्यामुळे काही महिन्यांत चित्रपट तयार होईल, अशी अपेक्षा आहे.

बातम्या आणखी आहेत...