आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'विक्रम'ने वर्ल्डवाइड कमावले 300 कोटी:आता मी माझे सर्व कर्ज फेडू शकतो, कुटुंब आणि मित्रांनासुद्धा काही देऊ शकतो - कमल हासन

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'विक्रम'ने 11 दिवसांत जगभरात 322.15 कोटींची कमाई केली

साऊथचे सुपरस्टार कमल हासन यांचा 'विक्रम' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने अवघ्या 11 दिवसांत जगभरात 322 कोटींहून अधिकची कमाई केली आहे. एवढेच नाही तर या चित्रपटाने भारतातून 220 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. यासोबतच कमल हासन यांच्या कारकिर्दीतील हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. 'विक्रम'च्या यशानंतर आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कमल हासन यांनी खुलासा केला की, या चित्रपटातून जेवढे पैसे मिळणार आहेत, त्यातून ते आता त्यांचे सर्व कर्ज फेडू शकतील.

कुटुंब आणि मित्रांना आता काही तरी देऊ शकेल
कमल हासन म्हणाले, "आता मी माझे सर्व कर्ज फेडू शकेन. मी माझ्या आवडीच्या गोष्टींवर काम करेन. मला जे काही हवे आहे ते मी माझ्या कुटुंबीयांना आणि मित्रांना देऊ शकतो." इतकेच नाही तर त्यांचा हा चित्रपट 300 कोटी रुपये कमवेल, असे भविष्य जेव्हा त्यांनी वर्तवले होते, तेव्हा त्यांच्यावर कुणीही विश्वास ठेवला नव्हता, असा खुलासादेखील त्यांनी केला आहे.

मला फक्त एक चांगली व्यक्ती व्हायचे आहे
कमल हासन पुढे म्हणाले, "जर माझ्याकडे भविष्यात काहीच उरले नाही, तर मी म्हणेन की माझ्याकडे देण्यासारखे आणखी काही नाही. मला दुसऱ्याचे पैसे घेऊन इतरांना मदत करण्याचे नाटक करण्याची गरज नाही. माझ्याकडे कोणतेही ग्रँड टायटल नाही. मला फक्त एक चांगली व्यक्ती व्हायचे आहे," असे ते म्हणाले.

11 दिवसांत जगभरात 322.15 कोटींची कमाई केली
वृत्तानुसार, 150 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 11 दिवसांत भारतातील सर्व भाषांमध्ये 220.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 322.15 कोटी रुपयांचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. हा चित्रपट जगभरात 3200 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला.

या अॅक्शन ड्रामा चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराज यांनी केले आहे. कमल हासन व्यतिरिक्त या चित्रपटात विजय सेतुपती, फहाद फाजील, कालिदास जयराम, नारायण, अँटनी वर्गीस आणि अर्जुन दास यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात सुर्याचाही एक कॅमिओ आहे.

बातम्या आणखी आहेत...