आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहित आहे का?:संवादाविना रसिकमनावर छाप सोडणारा मूकपट 'पुष्पक',  अंघोळ करताना दिग्दर्शकाला आला होता चित्रपट बनवण्याचा विचार

2 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • 1987 मध्ये आलेला 'पुष्पक' हा चित्रपट वेगवेगळ्या नावाने सहा भाषांत रिलीज झाला होता.

काही न बोलता समाजावर छाप सोडणाऱ्या मूक चित्रपटावर आज आपण चर्चा करू. हा चित्रपट आहे 1987 मध्ये रिलीज झालेला आणि सिंगीतम श्रीनिवास राव दिग्दर्शित 'पुष्पक'. एका बेरोजगार युवकाचा संघर्ष यात दाखवण्यात आला. लवकर यश मिळवण्यासाठी तो कसा शॉर्टकट वापरतो आणि त्यात कसा अडकतो. एका मोठ्या समस्येवर विनोदांतून प्रहार करण्यात आला होता. 

चित्रपटाची कथा बेरोजगार युवक कमल हासनवर आधारित आहे. तो श्रीमंत उद्योजकाची आयडी चोरी करून त्याला घरात बंंद करून ठेवतो. पंचतारांकित हॉटेल पुष्पकमध्ये जाऊन त्याचे आयुष्य जगतो. त्याला जादुगाराची मुलगी (अमाला अन्नीकेनी)शी प्रेम होते. एक किडनॅपर (टीनू आनंद) त्या बिजनेसमनच्या शोधात निघतो तेव्हा तो अडचणीत येतो.

 • अंघोळ करताना आला होता दिग्दर्शक श्रीनिवास राव यांना 'पुष्पक' बनवण्याचा विचार

त्या काळात श्रीनिवास राव केव्ही रेड्डीचे सहायक होते. त्यांच्या चित्रपटातील एका दृश्यात संवादाशिवाय एका पात्राला भीती दाखवायची होती. हे दृश्य पाहून राव यांना अशा कथानकावर संपूर्ण चित्रपट बनविला जाऊ शकत नाही का, असा प्रश्न पडला. यावर ते बरेच दिवस विचार करत राहिले. तथापि, कथा आणि अशा चित्रपटाच्या बाबींबद्दल त्याला फारशी कल्पना नव्हती.  ‘पुष्पक’ बनवण्याची कल्पना त्यांना अंघोळ करताना आली. यानंतर दोन आठवड्यांनंतर त्यांनी याची कथा लिहिली आणि पटकथा कमल हासन यांना सांगितली. कमलसुद्धा पटकथा ऐकल्यानंतर लगेच तयार झाले. राव यांनी यासाठी आधी निर्माता शोधला, पण शेवटी त्यांनीच बनवला. अशाप्रकारे पुष्पकला भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘मूक काळानंतर’ बनवलेल्या पहिल्या मूक चित्रपटाचा दर्जा मिळाला.

 • संगीतात प्रयोगाच्या काळात हा मूकपट

चित्रपटात जेव्हा संगीत आणि संवादावर अनेक प्रकारचे प्रयोग होत होते तेव्हा पुष्पक चित्रपट बनवण्यात आला. त्या काळात मूक सिनेमा बनवण्याचा विचार कोणीच करू शकत नव्हतं. मूकपट असूनही त्याचा बॅकग्राउंड स्कोर चांगले होते. या चित्रपटाचे वैशिष्ट्ये म्हणजे त्याचे स्क्रीनप्ले कमालीचे हाेते. यात कमल हासन मुख्य भूमिकेत होते. याविषयी दिग्दर्शक श्रीनिवास राव म्हणतात, चित्रपट सर्व भाषेत रिलीज होणार होता त्यामुळे सर्वच प्रेक्षकांना आवडेल असा हिरो यात घ्यायचा होता. क्रिएटिव्ह माणूस असल्याने कमलला घेतले होते. आम्ही यापूर्वी काम केले. तो कधीच माझ्या कामात हस्तक्षेप करणार नाही, याची मला खात्री होती. हा एक प्रयोगात्मक चित्रपट होता. शॉर्टकट मधून कमावलेल्या पैशातून तुम्ही सुख मिळवू शकत नाही, असा संदेश यातून देण्यात आला होता.

 • नीलम कोठारीला घेता-घेता अमाला झाली हीरोइन

राव यांनी आधीच कमल यांना घेतले होते. त्यानंतर अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी त्यांनी नीलम कोठारीची निवड केली होती. मात्र नीलमला चित्रपटात चांगले कपडे घालायचे होते त्यामुळे रावने तिला घेतले नाही. अमाला यांना चेन्नईत एका पुरस्कार समारंभात पाहिल्यानंतर रावने तिला चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली. ती अमालाने मान्य केली. किडनॅपरच्या पात्रासाठी टीनू आनंद यांना घेण्याआधी राव यांनी आधी अमरीश पुरीला संपर्क केला होता मात्र त्यांच्या तारखा मिळल्या नाहीत.

 • चित्रपट पाहून सत्यजित रे यांनी केले होते राव यांचे कौतुक

‘पुष्पक’ बॉक्स ऑफिसवर इतका हिट ठरला की, एकट्या बंगळुरूमध्ये 35 आठवड्यापर्यंत चालला. राव त्या काळात कोलकात्याला गेले होते, तेव्हा त्यांची भेट दिग्गज दिग्दर्शक सत्यजित रे यांच्याशी झाली. चित्रपट पाहिल्यानंतर सत्यजितने राव यांना बोलावले, शुभेच्छा दिल्या आणि चित्रपटाचे कौतुकही केले.

 • शूटिंगसाठी तयार नव्हते हॉटेल मॅनेजमेंट, अभिनेत्याने केले तयार

‘पुष्पक’च्या मुख्य भागाचे शूटिंग बंगळुरूच्या विंडसर मॅनोर हॉटेलमध्ये करण्यात आले. सुरुवातीला हॉटेल मॅनेजमेंट चित्रपटाच्या शूटिंगसाठी तयार नव्हते अभिनेते शृंगार नागराजने त्यांना सांगितले, चित्रपटात हॉटेल दाखवले जाईल, पूर्ण जगाला या हॉटेलची माहिती कळेल, त्यामुळे हॉटेलचा व्यवसाय वाढेल, तेव्हा कुठे मॅनेजमेंटने चित्रपटाच्या शूटिंगसाठी परवानगी दिली.

 • विनोदी दृश्य ठरले अतिशय महत्त्वाचे

अनेक दृश्ये पोट धरून हसवतात. एक दृश्य आहे, ज्यात कमल हासनची व्यक्तिरेखा अपहरण केलेल्या व्यावसायिकासाठी पाॅट घेऊन येते आणि ते एका डब्यात पॅक करून पुन्हा मार्केटमधून रस्ता काढत बस स्टॉपवर जाऊन ठेवतो. संवादाविना परिस्थिती समजेल अशा पद्धतीने ते दृश्य चित्रित करण्यात आले होते. अशाच एका दृश्यात टीनू आनंदचे पात्र बर्फाचा चाकू घेऊन व्यावसायिक म्हणून कमलला ठार मारण्याचा प्रयत्न करतो.

हे पुरस्कार मिळवले 

 • 03 श्रेणीत पुष्पक’ला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. उत्कृष्ट दिग्दर्शक, चित्रपट आणि अभिनेता
 • 03 मोठे महोत्सव (इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया, कान्स आणि शांघाय फिल्म फेस्टिव्हल) मध्ये प्रीमियर करण्यात आले.
 • 35 आठवडे बंगळुरूच्या थिएटरमध्ये चालला. स्लीपर हिट (उशिरा हिट झालेला) चित्रपट ठरला.
 • 1988 मध्ये लोकप्रिय चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. आंतरराष्ट्रीय महोत्स्वातही भाग घेतला. याच वर्षी सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपटाचा ‘गोल्डन लोटस अवॉर्ड’ देखील मिळाल.
बातम्या आणखी आहेत...