आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कथा चोरीच्या आरोपावर स्पष्टीकरण:कंगना रनोटच्या 'मणिकर्णिका रिटर्न्स' चित्रपटाचे निर्माते कमल जैन म्हणाले - 1950 पूर्वीच्या कथांवर कॉपीराइट नसते

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगना या चित्रपटाचे शूटिंग जानेवारी 2022 मध्ये सुरू करणार आहे.

अभिनेत्री कंगना रनोटच्या आगामी ‘मणिकर्णिका रिटर्न्सः द लीजेंड ऑफ दिड्डा’ या चित्रपट वादाच्या भोव-यात सापडला आहे. लेखक आशिष कौल यांनी कंगनावर कथा चोरीचा आरोप लावला आहे. मात्र चित्रपटाचे निर्माते कमल जैन यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. दिव्य मराठीसोबत झालेल्या संभाषणात ते म्हणाले, "मला आशिष कौल कोण आहेत हे माहित नाही. किंवा त्यांचे पुस्तक देखील मी वाचलेले नाही."

अशा कथांवर कॉपीराइटची आवश्यकता नाही कमल जैन पुढे म्हणाले, "ज्या महान योद्धा किंवा वीरांगणांच्या कथा 1950 पुर्वींच्या आहेत, त्यावर कॉपीराइट्स नसते. आम्ही झाशीच्या राणीवर चित्रपट केला, त्यासाठी आम्हाला कुणाकडूनही अधिकार घ्यावे लागले नव्हते. मात्र आम्ही धोनीच्या बायोपिकसाठी हक्क विकत घेतले होते, कारण ती आजची कहाणी आहे," असे जैन यांनी सांगितले.

दोन लेखकांवर सोपवले आहे कथा लिहिण्याचे काम जैन म्हणाले, "आम्ही दोन मोठ्या लेखकांना दिद्दावर एक लार्जन दॅन लाइफ कथा लिहिण्याचे काम सोपवले आहे. त्यांची नावेदेखील आम्ही लवकरच जाहीर करणार आहोत. "अ‍ॅव्हेंजर्स' सीरिजमधील 'ब्लॅक पँथर'ची कथा सर्वात स्ट्राँग आहे, त्यात भारतीय पौराणिक कथांची एक झलक देखील आहे. आम्ही 'ब्लॅक पँथर'च्या स्केलवर 'दिड्डा' घेऊन येणार आहोत. बजेट 80 कोटींच्या वर जाऊ शकते,' असे जैन म्हणाले.

लेखक आशिष कौल यांचे काय आरोप आहेत?

आपली फसवणूक झाल्याचा दावा काश्मिरी पंडित आशिष कौल यांनी केला आहे. त्यांनी काश्मीरची वीरांगणा दिद्दावर एक पुस्तक लिहिले आहे. त्याचे अनावरण अमिताभ बच्चन यांच्या हस्ते झाले होते. त्यांच्या मते त्यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणीही या विषयावर पुस्तक लिहिले नाही. अशा परिस्थितीत कोणी यावर चित्रपट कसा बनवू शकेल, असे कौल यांचे म्हणणे आहे.

कौल यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्यांनी कंगनाला आपल्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिण्यासाठी मेल केला होता, मात्र आता तिने कथा चोरी करत चित्रपटाची घोषणा केली.

कौल यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेसाठी कंगनाला अनेकदा मेल केले. पण तिने त्यांना उत्तर दिले नाही. सोशल मीडियावरसुद्धा त्यांनी आपल्या पुस्तकासंदर्भात कंगनाला बर्‍याच वेळा टॅग केले. आता मात्र तिने कथा चोरी करून त्यांच्या हक्कांचे उल्लंघन केले, असे कौल यांनी म्हटले आहे.

कौल यांनी सांगितले की, 'दिद्दा द वॉरियर क्वीन ऑफ काश्मीर' हे पुस्तक त्यांनी चित्रपटाच्या पटकथेसारखे लिहिले आहे. ते रिलायन्स एंटरटेनमेंट सोबत मिळून या विषयावर बिग बजेट चित्रपटाचीही योजना आखत आहेत. कोरोनामुळे त्यांचे या प्रोजेक्टवर काम पुढे जाऊ शकले नाही. पण या कथेसंबंधी त्यांची प्रॉडक्शन हाऊसशी बोलणी सुरु आहेत.

कंगनाने गुरुवारी केली घोषणा
कंगना सध्या आपल्या आगामी ‘धाकड’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. गुरुवारी तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून 2018 मध्ये रिलीज झालेला ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’चा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आणत असल्याची घोषणा केली होती. तिच्या या आगामी चित्रपटाचे नाव ‘मणिकर्णिका रिटर्न्स: द लीजेंड ऑफ दिद्दा’ असेल. या चित्रपटाची निर्मितीदेखील ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’चे निर्माते कमल जैन करणार आहेत.

काश्मीरची शूर राणी म्हणून ओळखली जाते दिद्दा
खरं तर, राणी दिद्दा अविभाजित काश्मीरची शूर राणी म्हणून ओळखली जाते. एका पायाने अपंग असूनही त्यांनी दोनदा युद्धात मुघल आक्रमक मेहमूद गझनवीचा पराभव केला होता. ती अजूनही धाडसी वीरांगना म्हणून ओळखली जाते.

या चित्रपटासंदर्भात कंगना म्हणते, तिच्या उर्वरित चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतरच मी ‘मणिकर्णिका रिटर्न्स: द लीजेंड ऑफ दिद्दा’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करेल. सूत्रानुसार, कंगना या चित्रपटाचे शूटिंग जानेवारी 2022 मध्ये सुरू करणार आहे. कंगना आणि कमल जैनने गेल्या आठवड्यातच चित्रपटाची फायनल स्क्रिप्ट तयार केली आहे. हा चित्रपट मागील चित्रपटापेक्षा भव्य आणि मोठ्या बजेटचा असेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वत: कंगना करणार आहे, की दुसरे काेणी करणार हे अजून ठरले नाही. सध्या ती आपले बाकीचे काम पूर्ण करत आहे.

बातम्या आणखी आहेत...