आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमाल रशीद खानचे कमी झाले 10 किलो वजन:म्हणाला- तुरुंगात 10 दिवस फक्त पाण्यावर काढले

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता आणि स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल रशीद खान उर्फ ​​केआरके तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दररोज नवीन ट्विट पोस्ट करत आहे. आता अलीकडेचे केआरकेने लॉकअपमध्ये 10 दिवस कसा घालवले, ते सांगितले आहे.. केआरकेने ट्विट केले की, त्याने हे 10 दिवस तुरुंगात फक्त पाण्यावर काढले होते.

तुरुंगात पाण्यावर दिवस काढले
केआरकेने लिहिले की, "मी लॉकअपमध्ये दहा दिवस फक्त पाणी पिऊन काढले. त्यामुळे माझे 10 किलो वजन कमी झाले आहे." यापूर्वी केआरकेने तुरुंगातून बाहेर पडल्यावर पहिले ट्विट केले होते, त्यात त्याने लिहिले होते की, मी सूड उगवण्यासाठी परत आलोय, पण दुस-या दिवशी त्याने त्याचे शब्द मागे घेतले होते.

माझ्यासोबत जे काही वाईट घडले ते विसरलोय
केआरकेने स्पष्टीकरण देताना ट्विटमध्ये लिहिले की, ‘मीडिया नवीन स्टोरी तयार करत आहे. मी सुखरूप माझ्या घरी परतलो आहे. मला कोणाकडून बदला घेण्याची गरज नाही. माझ्यासोबत जे काही वाईट घडले ते सर्व मी विसरलो आहे. ते माझ्या नशिबातच लिहिलेले असेल असे मला वाटते आहे." 2020 मध्ये केलेल्या एका वादग्रस्त ट्विटसाठी मुंबई पोलिसांनी केआरकेला 30 ऑगस्ट रोजी अटक केली होती.

KRK ला मिळाला सशर्त जामीन
केआरकेला 30 ऑगस्ट रोजी मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली होती, तो काही कामानिमित्त दुबईहून मुंबईत आला होता. यानंतर केआरकेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दिवंगत अभिनेते इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्यावर आक्षेपार्ह ट्विट केल्याबद्दल केआरकेविरोधात 2020 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2021 मध्ये वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये KRK विरोधात लैंगिक शोषणाचा सुद्धा गुन्हा नोंदवण्यात आला होता. 9 दिवस कारागृहात राहिल्यानंतर दोन्ही प्रकरणातील सुनावणीनंतर न्यायालयाने त्याला सशर्त जामीन दिला आहे.

केआरकेने ट्विटमध्ये काय लिहिले?
इरफान यांचा मृत्यू 29 एप्रिल 2020 रोजी सकाळी 11.11 वा. झाला. तर ऋषी कपूर यांनी 30 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर केआरके यांनी एक वादग्रस्त ट्विट केले होते. तो म्हणाला होता -'मी गांभिर्याने सांगत आहे की, कोरोना तोपर्यंत जाणार नाही जोपर्यंत तो आपल्यासोबत काही सुप्रसिद्ध व्यक्तींना घेऊन जाणार नाही. तेव्हा मी नाव लिहिले नव्हते. कारण, लोकांनी मला शिवीगाळ केली असती. पण ऋषी कपूर व इरफान जातील हे मला ठाऊक होते. पुढील क्रमांक कुणाचा आहे आहे हे ही मला ठाऊक आहे.'

ऋषी कपूर यांना रिलायन्स रुग्णालयात दाखल केल्यानंतरही त्याने एक ट्विट केले होते. त्यात तो म्हणाला होता - 'ऋषी कपूर यांना एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मी त्यांना केवळ एवढे सांगू इच्छितो की, लवकर ठिक होऊन बाहेर या, निघून जावू नका. कारण, दारूची दुकाने अवघ्या 2-3 दिवसांत पुन्हा सुरू होणार आहेत.'

बातम्या आणखी आहेत...