आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

45 वर्षांचा झाला कमाल राशिद खान:केआरकेने केला होता दावा - दुबईत आहे 21,000 चौरस फूट घर, हॉलंडहून येते दूध आणि लंडनहून चहा पावडर!

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेता म्हणून केआरकेने 'देशद्रोही' या चित्रपटातून अभिनयात पाऊल ठेवले होते.

स्वतःला नंबर वन क्रिटिक आणि ट्रेड अॅनालिस्ट सांगणारा कमाल आर खान (केआरके) 45 वर्षांचा झाला आहे. त्याचा जन्म 1 जानेवारी 1975 रोजी झाला होता. केआरके नेहमीच कोणत्या तरी विषयावरुन वादात सापडत असतो. अनेकदा विवादित वक्तव्यामुळे चर्चेत राहिलेल्या कमालची संपूर्ण लाईफ अत्यंत इंट्रेस्टिंग आहे. जाणून घेऊयात त्याच्याशी संबधित काही रंजक गोष्टी

केआरकेच्या सांगण्यानुसार, अभिनयात करिअर करण्यासाठी तो घरातून पळून मुंबईत आला होता. त्याने निर्माता म्हणून 2005 मध्ये आलेल्या सितम या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते. त्यानंतर त्याने अनेक लो-बजेट हिंदी आणि भोजपुरी चित्रपटांची निर्मिती केली. तो हॉलंडहून आलेले दूध आणि चहा पावडर लंडनहून आलेली वापरतो.

21 हजार चौ. फुटाच्या घरात राहतो केआरके

  • केआरकेचे खरे नाव राशिद खान असे आहे. त्याने त्याच्या नावापुढे 'कमाल' नंतर जोडले आहे.
  • केआरकेने दावा केला आहे की, तो 21 हजार स्क्वेअर फुटांच्या बंगल्यात राहतो. त्याने सांगितल्यानुसार तो हॉलंडहून दूध मागवतो, फ्रांसहून पाणी आणि लंडनहून चाहाची पावडर मागवतो.
  • त्याच्या घराचा समोरचा भाग काचाचा बनलेला आहे. त्यावर मोठया अक्षरात R लिहिले आहे.
  • केआरकेजवळ दुबई एक बंगला असून त्याचे नाव जन्नत असे आहे. त्याच्या घरातील लिव्हिंग रुम, कॉरिडोर आणि जीमच्या भिंतींवर मोठमोठे फोटोज लावलेले दिसतात.
  • सध्या तो मुंबईत गारमेंटचा बिझनेस करतो. त्याचे टर्नओव्हर 1000 कोटी इतके आहे. केआरकेचा त्याच्या भावासोबत मिळून हा व्यवसाय आहे. एवढेच नाही तर आखाती देशांत मजूर पाठवण्याचाही त्याचा बिझनेस आहे.

वर्सोवा येथे ऑफिस

  • केआरकेने सांगितल्यानुसार, त्याचे ऑफिस वर्सोवा येथे आहे. केआरके ज्या व्यक्तीला ट्विटरवर पसंत करत नाही, त्याला तो '2RSPpl' अर्थात 'दो कौड़ी के लोग' असे म्हणतो.

2008 मध्ये डेब्यू

  • अभिनेता म्हणून केआरकेने 'देशद्रोही' या चित्रपटातून अभिनयात पाऊल ठेवले होते. हा चित्रपट महाराष्ट्रात बॅन करण्यात आला होता. त्यानंतर 2014 मध्ये तो 'एक विलेन' या चित्रपटात एका छोट्या भूमिकेत झळकला होता. याशिवाय 'बिग बॉस'च्या तिस-या पर्वात स्पर्धक म्हणून तो सहभागी झाला होता. या शोमध्ये फॅशन डिझायनर रोहित बलवर बॉटल फेकून मारल्याने तो चर्चेत आला होता.
  • केआरके सोशल मीडियावर बराच अॅक्टिव असतो. बॉलिवूड कलाकारांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन तो चर्चेत राहतो. याशिवाय आपल्या युट्यूब चॅनलवर तो चित्रपटांचे रिव्ह्यू देखील देतो.
बातम्या आणखी आहेत...