आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडचे रेकॉर्ड्स:चित्रपटात नृत्य केल्याने कमलाबाईंना समाजाने केले होते बहिष्कृत, 'इंद्रसभे'चा 71 गाण्यांचा विक्रम आजतागायत कायम

लेखिका : कविता राजपूत19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतीय चित्रपटसृष्टीत पहिल्यांदा कधी आणि काय घडलं ते जाणून घेऊया...

भारतीय चित्रपटसृष्टीला आज 109 वर्षे पूर्ण होत आहेत. 1913 मध्ये याच दिवशी दादासाहेब फाळके यांचा 'राजा हरिश्चंद्र' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. 1913 पासून आजपर्यंत चित्रपटसृष्टीत अनेक बदल झाले आहेत, पण चित्रपटांच्या बाबतीत पहिल्यांदाच ज्या गोष्टी घडल्या, त्याच्या कहाण्या अतिशय रंजक आहेत. 1913 मध्ये दादासाहेब फाळके यांच्या 'मोहिनी भस्मासुर' या चित्रपटात नृत्य करणाऱ्या कमलाबाई गोखले या पहिल्या महिला होत्या. चित्रपटात नृत्य केल्याने त्यांना समाजातून बहिष्कृत करण्यात आले होते.

बदलाचा काळ इतका वेगवान होता की, 1930 पर्यंत मूकपटांचे युग होते आणि 1931 मध्ये पहिला बोलपट आला, ज्यात 7 गाणी होती तर 1932 च्या 'इंद्रसभा'मध्ये तब्बल 71 गाणी होती. चित्रपटांमध्ये सर्वाधिक गाण्यांचा हा विक्रम आहे. 109 वर्षांच्या या प्रवासात भारतीय चित्रपटसृष्टीशी संबंधित अशा अनेक रंजक गोष्टी आहेत.

भारतीय चित्रपटसृष्टीत पहिल्यांदा कधी आणि काय घडलं ते जाणून घेऊया...

सुरु असलेल्या नाटकात पतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, कमलाबाईंनी साकारली पतीची भूमिका

'राजा हरिश्चंद्र' हा 40 मिनिटांचा चित्रपट होता, ज्यासाठी 15,000 रुपये खर्च आला होता. चित्रपटाचा प्रीमियर 21 एप्रिल 1913 रोजी ऑलिंपिया थिएटरमध्ये झाला, त्यानंतर 3 मे रोजी चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी काही मोजक्या लोकांना आमंत्रित केले गेले. नंतर प्रेक्षकांच्या या चित्रपटासाठी रांगा लागल्या. भारतीय सिनेविश्वातील हा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला.

1913 मध्ये 'मोहिनी भस्मासुर'मध्ये पहिल्यांदा एका महिलेने नृत्य केले. त्यांचे नाव होते कमलाबाई गोखले. कमलाबाई एक रंगभूमी कलाकार होत्या. कमलाबाई त्यांच्या आई दुर्गाबाई कामत यांच्यासोबत नाटकात काम करत होत्या.

राजा गोपीचंद या नाटकाच्या प्रयोगावेळी कमलाबाई यांचे पती रघुनाथ यांना हृदयविकाराचा झटका आला आणि तिथेच त्यांचे निधन झाले. येथेच शो मस्ट गो ऑनची प्रचिती आली. कमलाबाईंनी न खचता लगेचच पुरुषांचे कपडे परिधान केले आणि पतीची भूमिका साकारण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांचे वय अवघे 28 वर्षे होते. त्या काळात महिलेने चित्रपटात काम करणे चांगले समजले जात नव्हते, त्यामुळे कमलाबाई आणि त्यांच्या आईला समाजातून बहिष्कृत करण्यात आले होते.

17 वर्षांत 1300 मूकपट बनले, फक्त 29 रील उपलब्ध

1913-1930 च्या दरम्यान, सुमारे 1300 मूक चित्रपट बनवले गेले, परंतु यापैकी फक्त 29 चित्रपटांचे प्रिंट्स जतन झाले आणि उर्वरित चित्रपटांचे रील नष्ट झाले.

'पुंडलिक' हा भारतातील पहिला थिएट्रिकल चित्रपट आरजी तोरणे यांनी तयार केला होता. हा चित्रपट 1912 मध्ये 18 मे रोजी मुंबईतील कोरोनेशन सिनेमॅटोग्राफमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट एका ब्रिटिश सिनेमॅटोग्राफरने शूट केला होता आणि बरेच कलाकार ब्रिटिश असल्याने, त्याला पहिला मूक भारतीय चित्रपटाचा दर्जा मिळाला नाही.

दुर्गा खोटे या बोलक्या चित्रपटांच्या जमान्यातील सर्वात जास्त शिकलेली अभिनेत्री होती. त्यांनी बी.ए. पर्यंतचे शिक्षण घेतले होते आणि लग्नानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. हिंदी चित्रपटांचे पहिले पोस्टर 1920 मध्ये बाबूराव पेंटर यांनी त्यांचा पहिला चित्रपट 'वत्सला हरण'साठी बनवले होते.

साडेतीन तासांच्या चित्रपटात 71 गाणी

1937 मध्ये आलेला 'नौजवान' हा पहिला बॉलिवूड चित्रपट मानला जातो, ज्यामध्ये एकही गाणे नव्हते.

द्वारका दास संपत यांनी 1918 मध्ये कोहिनूर फिल्म कंपनी सुरू केली, त्यांनी मूक चित्रपटांमध्ये पार्श्व संगीत सादर केले, ज्यामध्ये संगीत पडद्याजवळून वाजवले गेले.

1932 मध्ये आलेला 'इंद्रसभा' हा चित्रपट जे.जे. मदन यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात तब्बल 71 गाणी होती आणि त्याचे संगीतकार नागरदास होते. तब्बल 71 गाणी संगीतबद्ध केल्याने ते या चित्रपटानंतर खूप चर्चेत आले होता. हा चित्रपट 3 तास 31 मिनिटांचा होता. भारतीय चित्रपटसृष्टीच्या पहिल्या संगीत दिग्दर्शिका सरस्वती देवी यांनी 1935 मध्ये 'जवानी की हवा' या चित्रपटाला पहिल्यांदा संगीत दिले होते. 'अब तुम्हारे हवाले वतन साथियों' (2004) चे शीर्षक गीत 15 मिनिटांचे होते जे चित्रपटात वेगवेगळ्या ठिकाणी दाखवण्यात आले होते.

दक्षिणेत बनला भारतातील पहिला 3D चित्रपट

'माय डिअर कुट्टीचातन' हा भारतात बनलेला पहिला 3D चित्रपट 1984 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याचे बजेट 25 कोटी रुपये होते. नंतर त्याच चित्रपटाचा हिंदी रिमेक 'छोटा चेतन' (1998) या नावाने बनवला गेला, ज्यात उर्मिला मातोंडकर देखील होती.

जॅकी श्रॉफ स्टारर 'शिवा का इंसाफ' हा 1985 मध्ये आलेला पहिला हिंदी 3D चित्रपट होता. त्यावेळी चित्रपटाचा निर्मिती खर्च 1.66 कोटी इतका होता आणि चित्रपटाने जगभरात 2.30 कोटींचे कलेक्शन केले होते. या चित्रपटात जॅकी श्रॉफ यांनी सुपरहिरो शिवाची भूमिका साकारली होती. योगायोगाने 31 वर्षांनंतर जॅकी यांचा मुलगा टायगरनेही 'फ्लाइंग जट' चित्रपटात सुपरहिरोची भूमिका साकारली होती.

संजीव कुमार यांनी एकाच चित्रपटात सर्वाधिक 9 भूमिका साकारल्या

1934 मध्ये 'हंटरवाली' या चित्रपटाने भारतीय चित्रपटांमध्ये स्टंटची सुरुवात झाली. या चित्रपटाची अभिनेत्री फियरलेस नाडिया ही देशातील पहिली स्टंट क्वीन होती.

1917 च्या लंका दहनमध्ये अण्णा साळुंके यांनी एकाच वेळी राम आणि सीतेची भूमिका साकारली होती. संजीव कुमार यांनी 'नया दिन नई रात' या चित्रपटात 9 भूमिका साकारून इतिहास घडवला. अपंग, आंधळा, वृद्ध, आजारी, कुष्ठरोगी, तृतीयपंथी, डाकू, तरुण, प्राध्यापक अशा भूमिका त्यांनी साकारल्या.

खलील हे मूकपटांचे पहिले सुपरस्टार

1925 मध्ये चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणाऱ्या रुबी मेयर्स उर्फ सुलोचना यांनी 65 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत 107 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.

खलील हे मूक आणि बोलक्या चित्रपटांच्या युगातील अभिनेता होते, जे 1920 ते 1940 या काळात चित्रपटांमध्ये सक्रिय होते. त्यांनी गुल-ए-बकावली, कुलीन कांता, द्रौपदी, सिनेमा क्वीन यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. खलील हे मुस्लिम होते, पण त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये हिंदू देवतांची भूमिका केली होती. विशेषतः राम आणि कृष्णाच्या भूमिकेत ते खूप लोकप्रिय झाले. पण आजारपणामुळे वयाच्या अवघ्या 37 व्या वर्षीच त्यांचे निधन झाले होते.

फतिमा बेगम या पहिल्या महिला दिग्दर्शक, निर्मात्या आणि लेखिका होत्या, त्यांनी बुलबुले-ए-परिस्तान (1925) हा चित्रपट बनवला होत्या.. त्या मूकपटातील सुपरस्टार झुबेदा, सुलताना आणि शेहजादी यांच्या मातोश्री होत्या.

देविका राणींचा 4 मिनिटांचा चुंबन सीन आजही एक विक्रम आहे

देविका राणी यांनी आपल्या 10 वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत केवळ 15 चित्रपटांमध्ये काम केले, पण त्या हिंदी चित्रपटसृष्टीत अजरामर झाल्या.

देविका राणी यांनी कर्मा चित्रपटात त्यांचे पती हिमांशू रायसोबत चार मिनिटांचा किसिंग सीन दिला होता, ज्याचा रेकॉर्ड आजतागायत मोडलेला नाही. या चित्रपटाचा प्रीमियर इंग्लंडमध्ये झाला होता. हा चित्रपट भारतात 'नागिन की रागिनी' या नावाने पुन्हा प्रदर्शित झाला, पण तो फ्लॉप ठरला.

'आन' (1951) हा देशातील नव्हे तर जगातील पहिला असा चित्रपट होता ज्यामध्ये 100 वाद्ये वापरली गेली होती. चित्रपटात पार्श्वसंगीत आणि साउंड मिक्सिंगही नौशाद यांनी केले होते. त्यासाठी ते लंडनला गेले होते. बॅकग्राउंड स्कोअरसाठी संगीतकार परदेशात जाण्याची ही पहिलीच वेळ होती. 'रतन' (1944) या चित्रपटानंतर नौशाद हे 25,000 रुपये घेणारे पहिले संगीतकार ठरले.

'किसान कन्या' (1937) हा चित्रपट खास होता कारण हा लेखक सआदत हसन मंटो यांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात एकूण 10 गाणी होती जी ग्रामोफोनवरून रिलीज झाली होती. बंगाली अभिनेत्री पद्मा देवी या चित्रपटात मुख्य भूमिकेत होती.

दोन इंटरव्हल्स असलेला 'संगम' हा पहिला चित्रपट

'इत्तेफाक' हा चित्रपट 1 तास 41 मिनिटांचा असल्याने त्यात इंटरव्हल नव्हता. 'इत्तेफाक'मध्ये राजेश खन्ना आणि नंदा मुख्य भूमिकेत होते. 'मेरा नाम जोकर' (1970) हा चार तास पंधरा मिनिटांचा दोन मध्यांतर असलेला चित्रपट होता. याआधी राज कपूर यांच्या 'संगम' (1964) मध्येही दोन इंटरव्हल होते, हा चित्रपट 3 तास 57 मिनिटांचा होता.

2014 मध्ये 3D मध्ये रिलीज झाला होता 'शोले'

'शोले' हा चित्रपट मुंबईतील मिनर्व्हा थिएटरमध्ये सुमारे 5 वर्षे सलग चालला. 2014 मध्ये तो 3D मध्ये पुन्हा रिलीज करण्यात आला होता.

'किस्मत' (1941) हा चित्रपट कोलकात्याच्या रॉक्सी थिएटरमध्ये 3 वर्षे 8 महिने चालला. एवढ्या मोठ्या कालावधीत थिएटरमध्ये झळकलेला हा पहिलाच चित्रपट होता. 'किस्मत'चा हा विक्रम आधी 'शोले' (1975) आणि नंतर 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' (1995) ने मोडला.

स्ट्रीट सिंगर आणि परफॉर्मरवर आधारित 'डिस्को डान्सर' (1984) हा भारतीय चित्रपटाच्या इतिहासात 100 कोटींपेक्षा जास्त व्यवसाय करणारा पहिला चित्रपट होता, परंतु त्याचे 90 टक्के कलेक्शन परदेशातून होते. त्यामुळे 'हम आपके हैं कौन' ( 1994) हा पहिला 100 कोटींची कमाई करणारा चित्रपट ठरला होता. या चित्रपटाने देशात 100 कोटींचा व्यवसाय केला होता.

बातम्या आणखी आहेत...