आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिवंगत पतीच्या मालमत्तेवरुन वाद:संगीतकार वाजिद यांच्या पत्नीची मालमत्तेच्या वादातून दीर साजिद आणि सासूविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 23 एप्रिल रोजी होणार सुनावणी

दिवंगत संगीतकार वाजिद खान यांची पत्नी कमलरुख यांनी मालमत्तेच्या वादातून दीर साजिद आणि सासूविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. वाजिद यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावे असलेल्या मालमत्तेवरून कमलरुख आणि वाजिद यांच्या कुटुंबियांमध्ये वाद निर्माण झाला होता. वाजिद यांच्या मालमत्तेवर त्यांच्या मुलांचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांची मालमत्ता अन्य कोणाला विकण्यापासून त्यांचा भाऊ आणि आईला मज्जाव करावा, अशी मागणी कमलरुख यांनी केली आहे.

साजिद-वाजिद या प्रसिद्ध संगीतकार जोडीतील वाजिद खान यांचे मागील वर्षी जून महिन्यात कोरोनामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधनाच्या सहा महिन्यानंतर कमलरुख यांनी वाजिद यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले होते.

23 एप्रिल रोजी होणार सुनावणी
वाजिद यांनी 2012 मध्ये मृत्यूपत्र तयार केले होते. त्यात त्यांनी त्यांच्या नावे असलेली मालमत्ता पत्नी कमलरुख आणि मुलांच्या नावे केली होती. त्यामुळे वाजिद यांचे हे मृत्युपत्र कायदेशीररीत्या मान्य केले जावे, अशी मागणी कमलरुख यांनी याचिकेद्वारे केली आहे. न्यायालयाने कमलरुख यांच्या याचिकेची दखल घेत साजिद आणि त्यांच्या आईला नोटीस बजावली आहे. यावर 23 एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...