आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रॅजेडी किंगची लव्ह लाइफ:विवाहित कामिनी कौशलच्या प्रेमात पडले होते दिलीप कुमार, अभिनेत्रीच्या भावांनी दिली होती दूर राहण्याची धमकी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सायरा दिलीप साहेबांच्या आयुष्यात येण्यापूर्वी अभिनेत्री कामिनी कौशल त्यांच्या आयुष्यात आल्या होत्या.

वयाच्या 98 व्या वर्षी या जगाचा कायमच निरोप घेणा-या दिलीप कुमार यांच्या आयुष्यातील काही घटना अशा आहेत, ज्या एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा वेगळ्या नाहीत. त्यांची प्रेमप्रकरणही बरीच गाजली आहेत. सायरा बानो त्यांच्या पत्नी होत. पण सायरा दिलीप साहेबांच्या आयुष्यात येण्यापूर्वी अभिनेत्री कामिनी कौशल त्यांच्या आयुष्यात आल्या होत्या. दिलीप कुमार यांच्या त्या पहिल्या गर्लफ्रेंड होत्या. 1948 मध्ये रिलीज झालेल्या 'शहीद' चित्रपटाच्या सेटवर या दोघांचे सूत जुळले होते. दोघांना लग्नही करायचे होते.

मेहुण्यासोबत करावे लागले होते लग्न
एका इंग्रजी वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार, कामिनी दिलीप कुमार यांना डेट करत होत्या, त्यावेळी त्या विवाहित होत्या. त्यांना आपल्या बहिणीच्या नव-यासोबत लग्न करावे लागले होते. कामिनी यांच्या बहिणीचा एका अपघातात मृत्यू झाला होता आणि त्यांना एक मूलही होते. बहिणीच्या निधनानंतर कुटुंबीयांच्या दबावामुळे कामिनी यांना आपल्या मेहुण्यासोबत लग्न केले होते. बी.एस. सूद हे त्यांच्या नव-याचे नाव होते. कामिनी यांच्या भावाला जेव्हा कळले की, त्यांची विवाहित बहीण दिलीप कुमारला डेट करतेय तेव्हा ते खूप चिडले होते. त्यांनी दिलीप कुमार यांना कामिनीसोबतचे संबंध तोडण्याची धमकी दिली. दुसरीकडे कामिनी यांनाही आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाता आले नाही.

कामिनी म्हणाल्या होत्या - आम्ही दोघेही दुःखी होतो
2014 मध्ये एका ग्लॅमर मासिकाशी झालेल्या संभाषणात कामिनी म्हणाल्या होत्या, "त्यांनी (दिलीप साहेब) आपल्या बायोग्राफीत लिहिले आहे की ते माझ्यापासून विभक्त झाल्यानंतर कोलमडले होते. परंतु सत्य हे आहे की, आम्ही दोघेही दुःखी झालो होतो. आम्ही एकमेकांसोबत खूप आनंदात होतो. पण मी काय करू शकते? माझे कुणावर तरी प्रेम आहे, असे सांगून मी नव-याला फसवू शकत नव्हते. मी माझ्या दिवंगत बहिणीला काय तोंड दाखवले असते. माझे पती खूप चांगले आहेत. त्यांना हे समजले की असे का घडले? कोणीही कधीही प्रेमात पडू शकते."

कामिनी यांच्यानंतर दिलीप साहेबांच्या आयुष्यात मधुबाला, वैजयंती माला, सायरा बानो आणि आसमा रहमान आल्या. आसमा दिलीप साहेबांच्या दुस-या पत्नी होत्या. लग्नाच्या दोन वर्षांनी दिलीप कुमार यांनी आसमा यांना घटस्फोट दिला आणि सायरा बानोजवळ ते परतले होते.

2013 मध्ये जेव्हा दिलीप कुमार कामिनीला ओळखू शकले नव्हते
अनेक वर्षानंतर दिलीप कुमार आणि कामिनी कौशल 2013 मध्ये मधील दिवंगत अभिनेते प्राण यांच्या प्रार्थना सभेत समोरासमोर आले होते. दिलीप साहेब पत्नी सायरासह तेथे पोहोचले होते. यावेळी दिलीप साहेबांची खुर्ची कामिनी कौशलच्या शेजारीच होती. दिलीप साहेब 90 वर्षांचे आणि कामिनी 86 वर्षांच्या होत्या. पण दिलीप साहेब यावेळी कामिनीला ओळखू शकले नव्हते. 2014 मध्ये एका मुलाखती दरम्यान कामिनी म्हणाल्या होत्या की, "दिलीप साहेबांनी मला ओळखले नाही, हे बघून मला खूप दुःख झाले होते. खरंतर त्यावेळी दिलीप कुमार यांना कुणालाही नीट ओळखता येत नव्हते. ते पाहून मला खूप वाईट वाटले आणि मी तिथून निघून गेले."

बातम्या आणखी आहेत...