आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी गुरुवारी अंधेरी येथील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात अभिनेत्री कंगना रनोट हिच्या विरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीसंदर्भात आपले निवेदन नोंदवले आहे. त्यांनी आपल्या वकिलांमार्फत कोर्टासमोर हे निवेदन सादर केले आहे.
जावेद अख्तर यांनी गेल्या महिन्यात कंगनाविरोधात फौजदारी तक्रार दाखल केली होती. कंगनाने एका मुलाखतीत आपली बदनामी केल्याचा आरोप त्यांनी लावला आहे. जावेद अख्तर यांनी आपल्याला घरी बोलावून हृतिक रोशनची माफी मागण्यासाठी धमकावल्याचे कंगनाने म्हटले होते. त्यांनी कंगनाविरोधात आयपीसी कलम 499 आणि 500 अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
रंगोलीनेही जावेद यांच्यावर लावले होते आरोप
कंगनाची बहीण आणि मॅनेजर रंगोली चंदेल हिने फेब्रुवारी 2020 मधअये सोशल मीडियावर एक पोस्ट करुन जावेद अख्तर यांनी कंगनाला धमकावल्याचा आरोप केला होता. तिने लिहिले होते, "जावेद अख्तर यांनी कंगनाला घरी बोलावले आणि हृतिक रोशनची माफी मागण्याची धमकी दिली. महेश भट्टच्या चित्रपटात सुसाइड बॉम्बरची भूमिका साकारण्यास नकार दिल्याने महेश भट्ट यांनी कंगनावर चप्पल फेकली होती. ते पंतप्रधानांना फॅसिस्ट म्हणतात .... चाचाजी तुम्ही दोघे काय आहात?", अशा आशयाचे ट्विट करुन रंगोलीने जावेद अख्तर आणि महेश भट्ट यांच्यावर निशाणा साधला होता.
हृतिक रोशन-कंगना रनोट वाद काय होता?
2009 पासून 2013 पर्यंत कंगना हृतिकसोबत रिलेशनशिपमध्ये होती. ब्रेकअपनंतर या दोघांमध्ये बराच वाद झाला होता. 2016 मध्ये एका कार्यक्रमात कंगनाने हृतिकचा उल्लेख सिली एक्स म्हणून केला होता. शिवाय रिलेशनशिप दरम्यान हृतिकने तिला केलेले मेल्स आपल्याकडे पुरावा म्हणून असल्याचा दावा तिने केला होता. यावरुन हृतिकने कंगनाविरोधात मुंबई गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली होती.
कंगनाच्या विरोधात आतापर्यंत 4 गुन्हे दाखल
ऑक्टोबरमध्ये कर्नाटकच्या तुमकुरमध्ये कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिच्यावर शेतक-यांचा अपमान केल्याचा आरोप होता. यानंतर मुंबईत 2 प्रकरणे नोंदली गेली. यामध्ये कंगनावर धर्माच्या आधारे द्वेष पसरवण्याचा आणि कोर्टाचा अवमान केल्याचा आरोप होता. चौथी तक्रार जावेद अख्तर यांच्यावतीने दाखल करण्यात आली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.