आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फटाक्यावरील बंदीवरून कंगना आक्रमक:दिवाळीत फटाके फोडायला दिले समर्थन; इंस्टावर स्टोरी शेअर करत राजकीय मंडळींना कंगनाने खडसावले

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रणौतने आता फटाक्यावरील बंदीवर आपले भाष्य केले आहे. कंगनाने तिचा इंस्टाग्रामवर एक स्टोरी टाकत फटाके वाजवायला समर्थन दर्शवले आहे. कंगना इंस्टावर आध्यात्मिक गुरू सद्गुरु यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात दिवाळी आणि लहानपणीच्या त्या फटाक्यांची आठवण शेअर केली आहे.

त्या व्हिडिओसाठी कंगनाने लिहले आहे की, "वायु प्रदूषणाच्या प्रार्श्वभुमीवर लहान मुलांना फटाक्यांच्या आनंदापासून लांब ठेवणे हे अतिशय चुकीचे आहे. तुम्ही त्यांच्या आनंदासाठी 3 दिवस आपल्या ऑफीसला पायी चालत जा आणि त्यांना फटाके फोडण्याचा आनंद घेऊ द्या." असे कॅप्शन टाकत कंगनाने फटाके वाजवायला समर्थन दिले आहे.

राज्य सरकारने फटाके न फोडण्याचे आवाहन केले आहे, त्यावरून देखील कंगनाने भाष्य केले आहे. ती म्हणाली की, "मी त्या सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छिते की, तुम्ही तीन दिवस कारचे वापर करू नका पायी जा जेणेकरून प्रदूषण होणार नाही" असा टोला देखील कंगनाने राजकीय मंडळींवर लगावला आहे.

बातम्या आणखी आहेत...