आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा वॉरियर बनणार कंगना रनोट:कंगनाने केली 'मणिकर्णिका'च्या दुस-या भागाची घोषणा, पडद्यावर साकारणार काश्मीरची राणी

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सध्या ‘धाकड’च्या चित्रीकरणात व्यस्त कंगना

मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट हिने मणिकर्णिका फ्रेंचाइजीच्या दुस-या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘मणिकर्णिका रिटर्न्स :द लीजेंड ऑफ दिद्दा’ हे या चित्रपटाचे शीर्षक आहे. निर्माते कमल जैन ‘मणिकर्णिका’मध्ये झाशीच्या राणीची कथा दाखवली गेली होती. तर या आगामी चित्रपटात काश्मीरच्या राणी कथा दाखवण्यात येणार आहे. चित्रपट निर्माते कमल जैन यांच्यासोबत फोटो शेअर करत कंगनाने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.

कमल जैन सोबतचा फोटो शेअर करताना कंगनाने लिहिले की, ‘झाशीच्या राणीसारख्या अनेक वीरांगनांच्या शौर्याचा साक्षी आपला भारत देश आहे. अशीच आणखी एक समोर न आलेली वीर कथा म्हणजे काश्मीरच्या राणीची, ज्यांनी महमुद गजनवीला एकदा नव्हे तर दोनदा पराभूत केले. लवकरच कमल जैन आणि मी ‘मणिकर्णिका रिटर्न्स: दि लिजेंड ऑफ दिद्दा’ प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहोत.’ कमल जैन यांच्यासोबत मिळून कंगनाने ‘मणिकर्णिका’ या चित्रपटाची निर्मिती केली होती.

सध्या ‘धाकड’च्या चित्रीकरणात व्यस्त कंगना

कंगना सध्या ‘धाकड’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात कंगना ‘बाल तस्करी’ आणि ‘महिला शोषणा’विरोधात लढा देताना दिसणार आहे. मध्यप्रदेशात सध्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. याशिवाय तिचा तेजस हा अंडर प्रॉडक्शन आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललितांचा बायोपिक थलायवीमध्येही कंगना झळकणार असून चित्रपट यावर्षी प्रदर्शित होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...