आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कंगना रनोटने बॉलिवूडला फटकारले:कंगनाने बॉलिवूडला म्हटले गटार, बड्या सेलिब्रिटींवर आरोप करत म्हणाली - ते तरुण मुलींचे शोषण करतात

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह 38 जणांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.
  • बॉलिवूडच्या गटारात रेंगाळणाऱ्यांना आता कळले का संपूर्ण जगासमोर अपमान केल्यावर कसे वाटते?, असे कंगना याचिकाकर्त्यांना उद्देशून म्हणाली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या तपासादरम्यान समोर आलेल्या ड्रग्ज कनेक्शनमध्ये नाव गोवल्यामुळे बाॅलिवूडमधील प्रख्यात चित्रपट निर्माते संतप्त झाले आहेत. यामुळे बाॅलिवूडमधील चार संघटना आणि 38 दिग्गज चित्रपट निर्मात्यांनी एकत्रितरीत्या सोमवारी दिल्ली हायकाेर्टात याचिका दाखल केली आहे. त्यांनी रिपब्लिक आणि टाइम्स नाऊ चॅनल्सला अपमानास्पद शेरेबाजी करण्यापासून राेखण्याची मागणी केली आहे. यानंतर अभिनेत्री कंगना रनोट हिने संताप व्यक्त केला आहे. तिने बॉलिवूडचा गटार म्हणून उल्लेख करत संपूर्ण जगासमोर अपमान झाल्यावर कसे वाटते? असा प्रश्न कोर्टाचा दरवाजा ठोठावणा-या सेलिब्रिटींना केला आहे.

कंगनाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "बॉलिवूड हे ड्रग्ज, शोषण, नेपोटिज्म आणि जिहादचे गटार आहे. हा गटार साफ करण्याऐवजी तो बंद केले आहे. #BollywoodStrikesBack ने माझ्यावरही खटला करायला पाहिजे. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत तुम्हा सर्वांना एक्सपोज करत राहील,” असे कंगना म्हणाली आहे.

मोठ्या हीरोजवर गंभीर आरोप
कंगनाने बॉलिवूडच्या बड्या नायकांवर गंभीर आरोप केले आहेत. तिने लिहिले, "मोठे कलाकार फक्त स्त्रियांवर आक्षेपच घेत नाहीत तर तरुण मुलींचे शोषणही करतात. सुशांत सिंह राजपूतसारख्या तरूणांना पुढे येऊ देत नाही, तर वयाच्या 50 व्या वर्षीदेखील शाळकरी मुलांच्या त्यांना भूमिका करायच्या असतात. डोळ्यांदेखत एखाद्यावर अन्याय होत असला तरीदेखील ते कधीही कोणाच्या बाजूने उभे राहत नाहीत," कोणत्याही बड्या अभिनेत्याच्या नावाचा उल्लेख न करता कंगनाने हा आरोप केला आहे.

कंगनाने पुढच्या ट्विटमध्ये लिहिले, 'तू माझे सिक्रेट लपव मी तुझे लपवतो, असा अलिखित नियम येथे प्रामाणिकपणे पाळला जातो. मी जन्माला आल्यापासून या मूठभर लोकांनाच इंडस्ट्री चालवताना बघतेय. बदल कधी होणार," असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे.

गटारात रेंगाळणारे म्हटले...
कंगनाने संताप व्यक्त करताना पुढे म्हटले 'बॉलिवूडच्या गटारात रेंगाळणाऱ्यांना आता कळले का संपूर्ण जगासमोर अपमान केल्यावर कसे वाटते? कित्येक वर्षांपासून मी स्वत: बॉलिवूडविरोधात शोषण, बदनामीची तक्रार केली. आणि त्याचमुळे आज एका कलाकाराचा मृत्यूही झाला. जर सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडचे गटार स्वच्छ होत असेल तर यांना त्रास का होतोय. याचाही सर्व हिशेब माझ्याकडे आहे,' अशा आशयाचे दोन ट्विट करुन कंगनाने आपला संताप व्यक्त केला आहे.

बेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेसविरोधात दाखल केली याचिका

बेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेसविरोधात विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह 38 जणांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. बॉलिवूडमधील व्यक्तींच्या गोपनीयतेच्या अधिकारांसह हस्तक्षेप करण्यापासून रोखण्याची मागणी खटल्यात आहे. रिपब्लिक टीव्ही, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी आणि टाइम्स नाऊ, राहुल शिवशंकर, नविका कुमार व अज्ञात प्रतिवाद्यांसह सोशल मीडियावरही अपमानजनक टिप्पण्या थांबवण्याची मागणी आहे.

या निर्मिती संस्था : याचिका दाखल करणाऱ्या निर्मात्यांत बाॅलfवूडमधील सर्वच प्रख्यात प्राॅडक्शन हाऊसचा समावेश आहे. यात आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान, साेहेल खान, अॅडलॅब्ज फिल्म्स, अजय देवगण फिल्म्स, आंदाेलन फिल्म्स, अनिल कपूर, अरबाज खान, आशुताेष गाेवारीकर, धर्मा प्राॅडक्शन्स, नाडियादवाला, राेहित शेट्टी, विनाेद चाेप्रा यांच्यासह यशराज फिल्म्स आदींचा समावेश आहे.