आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Kangana Gets Angry Over Bollywood's Silence On 'The KashmKangana Furious At Bollywood's Silence On The Kashmir Files, Said Chamche Went Into The Shadowsir Files', Says

कंगनाचा संताप:'द काश्मीर फाइल्स'बाबत बॉलिवूडने बाळगलेले मौन बघून कंगना संतापली, म्हणाली - चमच्यांना धक्का बसला आहे

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काय म्हणाली कंगना रनोट?

विवेक अग्निहोत्रींचा 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट 11 मार्चला रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान अभिनेत्री कंगना रनोट हिने या चित्रपटाचे कौतुक करत फिल्म इंडस्ट्रीवर निशाणा साधला आहे. चित्रपटाचे सकाळचे शोदेखील हाऊसफूल आहेत, हे बघून बुलीदाऊद आणि त्यांच्या चमच्यांना धक्काच बसला, असे कंगना म्हणाली आहे.

कंगनाने व्यक्त केला संताप
कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करताना लिहिले, द काश्मीर फाइल्सबाबात फिल्म इंडस्ट्रीने जे मौन बाळगले आहे त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या चित्रपटाचा केवळ आशयच नाही तर त्याचा कमाई हे एक उदाहरण आहे. चित्रपटाची गुंतवणूक आणि नफा यावर भविष्यात एक केस स्टडी होऊ शकते. हा या वर्षातील सर्वात प्रॉफिटेब आणि यशस्वी चित्रपट आहे.

या चित्रपटाने बिग बजेट किंवा व्हीएफएक्स चित्रपटांबद्दलचे अनेक समज मोडित काढले आहेत. द काश्मीर फाइल्स लोकांना चित्रपटगृहांकडे खेचत आहे. मल्टिप्लेक्समध्ये सकाळी 6 वाजताचे शो फुल झाले आहेत. हे सर्व अविश्वसनीय आहे. बुलीदाऊद आणि त्यांच्या चमच्यांना एक धक्काच बसला आहे.. कोणीही एक चकार शब्दही काढलेला नाही. आज संपूर्ण जग त्यांच्याकडे पाहत आहे पण तरीही त्यांनी एक शब्दही याबाबत काढलेला नाही. आता त्यांची वेळ संपली आहे," असं कंगना म्हणाली आहे.

अनेक राज्यांमध्ये करमुक्त झाला चित्रपट
मध्य प्रदेश आणि हरियाणानंतर आता गुजरातमध्येही 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. अलीकडेच दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, त्यांची पत्नी आणि अेभिनेत्री पल्लवी जोशी आणि निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांसोबतचा एक फोटो शेअर करत अभिषेक यांनी लिहिले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून चांगले वाटले. ही भेट खुपच खास ठरली आहे. कारण मोदी यांनी 'द कश्मीर फाइल्स' चित्रपटाचे कौतुक केले आहे. त्यामुळे आम्हाला हा चित्रपटाची निर्मिती करणे हे आमचे भाग्य असल्याचे अभिषेक यांनी म्हटले आहे. विवेक अग्निहोत्री यांनी अभिषेक अग्रवाल यांची पोस्ट शेअर केली असून, त्यात त्यांनी लिहले आहे की, "अभिषेक यांनी काश्मीरमधील सत्यावर प्रकाश टाकला आहे. सत्य दाखवायला हिम्मत लागते ते अभिषेकने दाखवून दिले आहे. मला खुप आनंद होत आहे," अशी पोस्ट विवेक अग्निहोत्री यांनी केली आहे.

हा चित्रपट 1990 च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि चिन्मय मांडलेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

बातम्या आणखी आहेत...