आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगना vs शिवसेना:कंगनाला सुरक्षा दिल्याबद्दल आई आशा देवींनी मानले पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांचे आभार, म्हणाल्या - तिला संरक्षण दिले नसते तर न जाणो तिचे काय झाले असते

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाच्या आईने हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचेही आभार मानले आहेत.

अभिनेत्री कंगना रनोट मुंबईची तुलाना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्याने मोठे वादंग उठले. शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाला मुंबईत येऊ देणार नाही असा धमकीवजा इशारा दिला. कंगनानेही हे चॅलेंज स्वीकारत 9 सप्टेंबर रोजी मुंबईत पाऊल ठेवले. या वादातच कंगनाच्या मुंबईस्थित ऑफिसवर बीएमसीचा हातोडा पडला. दरम्यान केंद्र सरकारने कंगनाला वाय श्रेणीची सुरक्षा पुरवली. त्यानंतर कंगनाने गृहमंत्री अमित शाहांचे आभार मानले.

आता कंगनाची आई आशा देवी यांनीही त्यांच्या मुलीला मदत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांचे आभार मानले आहेत.

“आम्ही सुरुवातीपासून काँग्रेसच्या बाजूने होतो, आमचे आजोबा पण काँग्रेसी होते, पण आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांचा पाठिंबा मिळाला, असे म्हणत कंगनाची आई आशा रनोट यांनी मोदी सरकारचे आभार मानले.

त्या म्हणाल्या, ‘संपूर्ण भारतातील जनतेच्या सदिच्छा कंगनासोबत आहेत. मला माझ्या मुलीचा अभिमान आहे, ती नेहमीच सत्याच्या पाठीशी उभी असते. आम्ही केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचे आभार मानतो, त्यांनी माझ्या मुलीचे रक्षण केले. कंगनाला सुरक्षा दिल्याबद्दल अमित शाहजींचे आभार, तिला संरक्षण दिले नसते तर न जाणो तिचे काय झाले असते’ अशा भावना आशा रनोट यांनी व्यक्त केल्या.

कंगनाची आई म्हणाली, ‘आम्ही सुरुवातीपासूनच काँग्रेससोबत होतो. आमचे आजोबासुद्धा सुरुवातीपासूनच काँग्रेस समर्थक होते. पण आम्हाला अमित शाहांचा पाठिंबा मिळाला. मी माझ्या मुलीसाठी प्रार्थना करते” असे म्हणत कंगनाच्या आईने हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचेही आभार मानले आहेत.

  • कंगना तोडलेल्या ऑफिसमधूनच काम करणार

कंगनाच्या मुंबईतील पालीहिलस्थित ऑफिसवर बीएमसीचा हातोडा पडला. कंगनाच्या याचिकेनंतर हायकोर्टाने पाडकामाला स्थगिती देण्याचे आदेश दिले. तसेच पालिकेला आपले म्हणणे मांडण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर कंगनाने थोरली बहीण रंगोलीसोबत गुरुवारी पालिकेने कारवाई केलेल्या ऑफिसच्या तोडकामाची पाहणी केली. आता पुन्हा या कार्यालयाची डागडुजी करण्यासाठी किंवा ते उभारण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत. पण एक सांगते, मीच याच उद्धवस्त झालेल्या, तोडलेल्या ऑफिसमधून काम करण्यास सुरुवात करेन, असे कंगना म्हणाली आहे.