आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिलजित आणि कंगना यांच्यात जुंपली:कगंनाने दिलजितला म्हटले - 'ओ करण जोहर के पालतू....', पलटवार करत दिलजित म्हणाला...

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेतकरी आंदोलनावरुन कंगना रनोट आणि दिलजित दोसांज यांच्यात सोशल मीडियावर शाब्दिक चकमक सुरु आहे.

दिलजित दोसांज आणि कंगना रनोट यांच्यात शेतकरी आंदोलनावरुन सोशल मीडियावर चांगलीच जुंपली आहे. शेतकरी आंदोलनात सामील एका वृद्ध महिलेला दिल्लीच्या शाहीन बागेतील आंदोलनात सामील झालेल्या 90 वर्षांच्या बिलकीस बानो समजून कंगनाने त्यांच्यावर टीका केली होती. ही वृद्ध महिला 100 रुपयांसाठी आंदोेलनात सहभागी होते, असे विधान कंगनाने केले होते. त्यावरुन कंगनावर बरीच टीका झाली होती. नंतर तिने आपली पोस्ट सोशल मीडियावरुन डिलीट केली होती. यावरुन अभिनेता दिलजित दोसांजने कंगनाला सुनावले होते. त्याने त्या वृद्ध महिलेचा एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करुन, ‘महिंदर कौर, मी तुमचा आदर करतो. कंगना हे ऐक. बंदा इतना भी अंधा नही होना चाहिए’ या आशयाचे कॅप्शन देत त्याने कंगनाला सुनावले होते.

शांत बसेल ती कंगना नाही...
दिलजितच्या या पोस्टवर कंगनाने पलटवार केला. तिने दिलजितसाठी अभद्र भाषेचा वापर केला. तिने दिलजितसाठी करण जोहरचा पालतू असा उल्लेख केला.

यावर दिलजितने पलटवार केला. त्याने म्हटले की, गोष्ट फिरवू नको. सरळ उत्तर देत. ज्यांना तू 100 रुपयांसाठी आंदोलनात सहभागी होतात, असे म्हटले जरा त्यांच्याकडे ये... त्या तुझी सर्व हिरोइनगिरी काढतील.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser