आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोशल मीडिया वॉर:हंसल मेहता म्हणाले- 'सिमरन करणे ही माझ्या जीवनातील सर्वात मोठी चूक', कंगना म्हणाली - 'अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का'

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाची प्रमुख भूमिका असलेला सिमरन हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता.

दिग्दर्शक हंसल मेहता त्यांच्या एका पोस्टमध्ये सध्या चर्चेत आले आहेत. त्यांनी कंगना रनोटची प्रमुख भूमिका असलेला सिमरन हा चित्रपट बनवणे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती, असे म्हटले आहे. यावर कंगनाने त्यांचा समाचार घेतला आहे.

हंसल मेहता हे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देण्याविषयी बोलताना म्हणाले होते की, प्रत्येकजण आपल्या जीवनात चुका करतो, जसे मी सिमरन चित्रपट निर्माण करण्याची चूक केली.

हंसल मेहता यांच्या या पोस्टवर कंगनाने प्रतिक्रिया दिली आहे. 'हंसल सर त्यावेळी मी तुमच्यासोबत होते. तुमच्यासाठी मी त्या काळात उभी होते, परंतु आता तुम्ही असे म्हणता आहेत. यावर मला आता एक गाणे आठवते “अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का...” असे कंगनाने म्हटले आहे. सोबतच तिने शेवटी हसणारा इमोजी शेअर केला आहे.

विशेष म्हणजे कंगनाच्या या प्रतिक्रियेनंतर हंसल मेहता सारवासावर करताना दिसले. त्यांनी आणखी एक पोस्ट शेअर करत मी जे म्हटले ते तुझ्याबद्दल नव्हते, असे ते म्हणाले. 'सिमरण' चित्रपट रिलीज झाल्यानंतर मला खूप त्रास देण्यात आला होता. आणि त्यामुळे सिमरन चित्रपट तयार करणे ही माझ्या आयुष्यातील चूक आहे. आणि तू एक उत्तम अभिनेत्री आहेस तुझा मी सन्मान करतो, असे हंसल मेहता यांनी स्पष्ट केले.

हंसल मेहता यांच्या या स्पष्टीकरणावर आता कंगना काय उत्तर देणार, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. कंगनाची प्रमुख भूमिका असलेला सिमरन हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नव्हता.