आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगना रनोटचे पुन्हा टिकास्त्र:कंगनाने आता बॉलिवूड या शब्दावर व्यक्त केला संताप, ट्विट करुन म्हणाली - बॉलिवूड शब्दही हॉलिवूड शब्दावरुन चोरला आहे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगना रनोटने आपल्या ट्विटमध्ये काही कलाकारांचे नाव न घेता त्यांना भांड म्हटले आहे.
  • बॉलिवूडला लक्ष्य करत कंगनाने स्वत:ला इंडस्ट्रीची अॅक्शन हिरोइन म्हटले आहे.

कंगना रनोट हिने पुन्हा एकदा बॉलिवूडवर जहरी टीका केली आहे. तिने इंडस्ट्रीतील काही कलाकारांचा भांड म्हणून उल्लेख करत भारतीय चित्रपटसृष्टीचे नाव 'बॉलिवूड' हे अपमानकारक असल्याचे म्हटले आहे. नुकत्याच आपल्या एका ट्विटमध्ये तिने लिहिले की, "आपल्याकडे कलाकार आहेत आणि आपल्याकडे भांडदेखील आहेत, इतकेत नाही तर आपल्याकडे भारतीय चित्रपटसृष्टीही आहे आणि आपल्याकडे बॉलिवूडही आहे. बॉलिवूड हा हॉलिवूड या शब्दावरुन चोरलेला शब्द आहे. अशा बॉलिवूडला खुलेपणाने नकार द्या,' असे आवाहन कंगनाने आपल्या ट्विटमध्ये केले आहे.

स्वतःला म्हटले बॉलिवूडची पहिली अॅक्शन हिरोईन

कंगनाने आपल्या आणखी एका ट्विटमध्ये स्वतःला बॉलिवूडची पहिली अॅक्शन हिरोईन म्हटले आहे. “तेसज आणि धाकड या दोन आगामी चित्रपटांसाठी मी ट्रेनिंग सुरु केले आहे. या चित्रपटांत मी सैनिक आणि एका डिटेक्टिव्हची भूमिका साकारणार आहे. यापूर्वी बॉलिवूडच्या थाळीने मला खूप काही दिले असेल पण मणिकर्णिकाचे यश माझे स्वत:च आहे. या चित्रपटातून मी बॉलिवूडला एकामागून एक अॅक्शन करणारी पहिली हिरोईन दिली,” अशा आशयाचे ट्विट कंगनाने केले आहे.

बॉलिवूडवर सतत तोफ डागतेय कंगना
बॉलिवूडला बुलीवूड म्हणत कंगना सतत इंडस्ट्रीवर टीका करत आहे. बुधवारी तिने वृत्तवाहिनीविरोधात न्यायालयाचे दार ठोठावणा-या निर्मात्यांवर टीकेची तोफ डागली. “बॉलिवूडमधील सर्व लांडगे एकत्र येऊन वृत्तमाध्यमांवर हल्ला करण्याची तयारी करत आहेत. ज्यावेळी मजुरांवर, शेतकऱ्यांवर, स्त्रियांवर, गरीब जनतेवर अन्याय होतो त्यावेळी ही मंडळी कुठे असतात? हे लोक आज मानवाधिकाराच्या गप्पा मारत आहेत पण इतरांच्या हक्कांवर गदा येते तेव्हा गप्प बसतात.” अशा आशयाचं ट्विट करुन कंगनाने आपला संताप व्यक्त केला होता.

कंगनाने बॉलिवूडला गटार म्हटले
कंगनाने आपल्या ट्विटमध्ये बॉलिवूडचा गटार म्हणून उल्लेख करत लिहिले की, "बॉलिवूड हे ड्रग्ज, शोषण, नेपोटिज्म आणि जिहादचे गटार आहे. हा गटार साफ करण्याऐवजी तो बंद केले आहे. #BollywoodStrikesBack ने माझ्यावरही खटला करायला पाहिजे. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत तुम्हा सर्वांना एक्सपोज करत राहील,” असे कंगना म्हणाली आहे.

कंगनाने बॉलिवूडच्या बड्या नायकांवर गंभीर आरोप केले आहेत. तिने लिहिले, "मोठे कलाकार फक्त स्त्रियांवर आक्षेपच घेत नाहीत तर तरुण मुलींचे शोषणही करतात. सुशांत सिंह राजपूतसारख्या तरूणांना पुढे येऊ देत नाही, तर वयाच्या 50 व्या वर्षीदेखील शाळकरी मुलांच्या त्यांना भूमिका करायच्या असतात. डोळ्यांदेखत एखाद्यावर अन्याय होत असला तरीदेखील ते कधीही कोणाच्या बाजूने उभे राहत नाहीत."

बातम्या आणखी आहेत...