आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगनाचा पलटवार:2014 मध्ये मिळालेल्या स्वातंत्र्याच्या विधानावर कंगना म्हणाली - 'मी चुकीची सिद्ध झाल्यास स्वतः पद्मश्री परत करेल'

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगना म्हणते, 1947 मध्ये कोणते युद्ध झाले ते मला माहीत नाही

अभिनेत्री कंगना रनोटने तिने केलेल्या स्वातंत्र्याच्या विधानावर स्वतःचा बचाव केला आहे. 1947 चे स्वातंत्र्य भीक मागून मिळाले आहे, असे वादग्रस्त वक्तव्य कंगनाने केले होते. त्यानंतर तिचा पद्मश्री पुरस्कार परत घ्या अशी मागणी जोर धरु लागली. आता कंगनाने यावर स्पष्टीकरण दिले आहे. 1947 मध्ये नेमके काय झाले होते ते मला सांगितल्यास मी स्वतः पद्मश्री पुरस्कार परत करण्यास तयार आहे, असे कंगनाने म्हटले आहे.

कंगनाने तिच्या वादग्रस्त विधानात म्हटले होते की, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यावर भारताला 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. 1947 मध्ये, देशाला मिळालेले स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाले, असे ती म्हणाली होती.

1947 मध्ये कोणते युद्ध झाले ते मला माहीत नाही
कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर एका पुस्तकातील काही भाग शेअर केला आहे. यात ती म्हणाली, 'त्या मुलाखतीत सर्व काही मी अगदी स्पष्टपणे सांगितले आहे. सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई आणि वीर सावरकर यांसारख्या महान लोकांच्या बलिदानावरही भाष्य केले. 1857 मध्ये स्वातंत्र्यासाठी पहिला सामूहिक लढा सुरू झाला. मला 1857 ची लढाई माहित आहे, पण 1947 मध्ये कोणते युद्ध लढले गेले त्याची मला माहित नाही. जर कोणी मला सांगू शकत असेल तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करेन आणि माफी देखील मागेन... कृपया माझी मदत करा,' असे कंगनाने म्हटले आहे.

कृपया मला उत्तर शोधण्यात मदत करा
कंगनाने पुढे लिहिले, "मी शहीद वीरांगणा राणी लक्ष्मीबाई यांच्यावर आधारित फीचर फिल्ममध्ये काम केले आहे... 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामावर सखोल संशोधन केले आहे... राष्ट्रवादासोबत उजव्या विचारसरणीचाही उदय झाला... पण अचानक तो संपुष्टात कसा आला? आणि गांधींनी भगतसिंगांना का मरु दिले?... नेताजी बोस यांची हत्या का झाली? त्यांना गांधींचा पाठिंबा मिळाला नाही... फाळणीची सीमा एका इंग्रजाने का आखली? भारतीयांनी स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्याऐवजी एकमेकांना का मारत होते?... या प्रश्नांची उत्तरे मी शोधत आहे कृपया उत्तर शोधण्यात मला मदत करा,' असे कंगना म्हणाली आहे.

जे चोर आहेत ते जळतील
मी परिणाम भोगायला तयार आहे, असे कंगना रनोट म्हणाली आहे. 'जोपर्यंत 2014 च्या स्वातंत्र्याचा संबंध आहे, मी विशेषतः सांगितले की आपल्याजवळ भौतिक स्वातंत्र्य असेल पण भारताची चेतना आणि विवेक 2014 मध्ये मुक्त झाला.. पहिल्यांदाच... इंग्रजी बोलता न येणे, किंवा छोट्या शहरातून असल्याने किंवा भातातत तयार झालेल्या वस्तू वापरल्याबद्दल लोक आपल्याला शरमेने मान खाली घालायला लावू शकत नाहीत... एकाच मुलाखतीत सगळे काही स्पष्ट आहे... पण जे चोर आहेत ते जळतील... कोणीही ते विझवू शकत नाही... जय हिंद,' असे कंगना म्हणाली आहे.

देशव्यापी निषेध
‘देशद्रोही' आणि 'प्रक्षोभक’ विधाने केल्याबद्दल आम आदमी पार्टीने मुंबई पोलिसांकडे कंगनाविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी करणारा अर्ज सादर केला आहे. कंगनाच्या वक्तव्यावर भाजप खासदार वरुण गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तिच्या या वक्तव्यावर देशभरातून निदर्शने होत आहेत.

बातम्या आणखी आहेत...