आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा एकदा संतापली कंगना:इस्राइलचे समर्थन केल्याने पुन्हा ट्रोल झाली कंगना, ट्रोलर्सना म्हणाली - 'बेटा मैं सभी बापों की मां हूं, आपली पातळी ओलांडू नका'

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाने इस्राइलला पाठिंबा दर्शवला होता

अभिनेत्री कंगना रानोट तिच्या बिनधास्त बोलसाठी ओळखली जाते. आपल्या वक्तव्यांमुळे ती कायम सोशल मीडिया यूजर्सच्या निशाण्यावर असते. अलीकडेच कंगनाने तिच्या सोशल मीडिया स्टोरीवर इस्राइल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील युद्धासारख्या परिस्थितीवर आपले मत दिले होते. मात्र त्यानंतर नेटक-यांनी तिला इस्राइलबद्दल काहीच माहिती नाही, असे म्हणत ट्रोल करायला सुरुवात केली. पण शांत बसेल ती कंगना नाही. आता तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ (इस्राइयलबद्दलचा) शेअर करत ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे.

मैं सभी बापों की मां हूं : कंगना रानोट
कंगनाने आपल्या सोशल मीडिया स्टोरीमध्ये लिहिले आहे, "इस्राइल कसा बनला हे व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता. ते एक अवैध राष्ट्र नाही. त्यांनी ब्रिटीशांकडून ते परत घेतले आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या (संयुक्त राष्ट्रांच्या) हस्तक्षेपाने तो वसवला. 6 मुस्लिम देशांनी त्यांच्यावर हल्ला केला, तेव्हापासून आतापर्यंत प्रत्येक हल्ल्यानंतर, ते अधिकाधिक त्यांच्या भूमीवर कब्जा करत आहेत. कारण जेव्हा तुम्ही युद्ध जिंकता, तेव्हा असेच घडते. जे इकडे ओरडत आहेत आणि म्हणत आहेत की मला काहीच माहित नाही, त्यांना मी सांगू इच्छिते की, बेटा मैं सभी बापों की मां हू, आपली पातळी सोडू नका."

'... तर भारतात फक्त हिंदूच असावेत'
कंगना इथवरच थांबली नाही, तर ती पुढे म्हणते, "जर आपण तर्कशास्त्र विचार करत असू तर भारतात केवळ हिंदू, अमेरिकेत रेड हेड्स आणि ऑस्ट्रेलियामध्ये फक्त आदिवासी असायला हवेत. ज्युंना बेकायदेशीर म्हणण्याची तुमची हिम्मत कशी झाली? जगात त्यांना काहीच स्थान नाही का? संपूर्ण जगाला मुर्ख बनवले आहे? ​​लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तुमचा खोडारडेपणा जगासमोर उघड झाला आहे.," असे कंगना म्हणाली आहे.

कंगनाने इस्राइलला पाठिंबा दर्शवला होता
इस्राइलने पॅलेस्टाईनवर हल्ला केला तेव्हा कंगनाने त्याचे समर्थन केले होते. तिने आपल्या सोशल मीडिया स्टोरीत लिहिले होते की, "कट्टरपंथी इस्लामिक दहशतवादापासून आपल्या लोकांना आणि देशाला वाचवण्यासाठी हा प्रत्येक देशाचा मूलभूत अधिकार आहे. भारत इस्राइलच्या पाठीशी उभा आहे. ज्यांना असे वाटते की दहशतवादाचा प्रतिकार करायचा आणि कडक निषेध करावा, त्यांनी त्यांच्याकडून शिकले पाहिजे," असे कंगना म्हणाली होती. कंगनाच्या या विधानानंतर सोशल मीडिया यूजर्सनी तिला इस्लामोफोबिक म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...