आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीव मसंदवर कंगनाचा निशाणा:पत्रकारिता सोडून करण जोहरच्या कंपनीत सामील झाले मसंद, कंगना म्हणाली - बरं झालं त्यांनी पत्रकारितेचा मुखवटा काढून टाकला

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपट समीक्षक राजीव मसंद बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहेत.

ज्येष्ठ पत्रकार राजीव मसंद यांनी पत्रकारिता सोडून करण जोहरच्या कंपनीत सामील झाले आहेत. करण जोहरच्या धर्मा कॉर्नरस्टोर एजन्सीत (DCA) ते COO (मुख्य कार्यकारी अधिकारी) या पदावर काम करणार आहेत. यावरुन कंगनाने आपली नाराजी व्यक्त केली आहे. बरं झालं त्यांनी पत्रकारितेचा मुखवटा काढून टाकला, तसेही ते करणचा चमचा होते, अशा शब्दांत कंगनाने मसंद यांच्यावर टीका केली आहे.

सुशांत आणि माझ्याविषयी नकारात्मक आर्टिकल लिहिले
कंगनाने लिहिले, ‘राजीव मसंद यांनी माझ्याबद्दल आणि सुशांतसिंह राजपूत यांच्याबद्दल अत्यंत वाईट लेख लिहिले होते. ते चांगल्या चित्रपटांची नकारात्मक समीक्षा लिहित असे. पत्रकार असूनही ते करण जोहरचा चमचा होते. हे चांगले झाले की, त्यांनी पत्रकारिता सोडली आणि अधिकृतपणे करण जोहरच्या गटांत सामील झाले,’ असे कंगना म्हणाली आहे.

मुव्ही माफियांनाही केले लक्ष्य
कंगनाने आपल्या आणखी एका पोस्टमध्ये मुव्ही माफियांवर निशाणा साधला. ‘अशाप्रकारे चित्रपट माफियांनी सर्वत्र महत्त्वाच्या लोकांना अपहृत केले आहे. हे लोक एजंट / समीक्षक / पत्रकार / वितरक / पुरस्कार ज्यूरीपर्यंत सगळ्यांना सेट करतात. अशा प्रकारे ते आपल्या वैयक्तिक जीवनातदेखील हस्तक्षेप करतात. हे लोक आपल्यावर बंदी घालू शकतात आणि आपली प्रतिमा मलीन करू शकतात. यामुळे बरेच लोक मरतात आणि काही मोजकेच लोक यांच्या पुढ्यात टिकतात. म्हणूनच चित्रपटसृष्टीतही कठोर कायदे आवश्यक आहेत,’ असे मत कंगनाने व्यक्त केले आहे.

अलीकडेच झाली कंपनीची घोषणा
करण जोहरने बंटी सजदेहसोबत मिळून टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी धर्मा कॉर्नरस्टोन एजन्सीची सुरुवात केली आहे. राजीव मसंद या आठवड्यात सीसीओ म्हणून डीसीएमध्ये सामील होतील. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, राजीव मसंद यांनी पत्रकारिता सोडून आता चित्रपट व्यवसायात प्रवेश केला आहे.

वयाच्या 16 व्या वर्षी पत्रकारितेत आले होते
जवळजवळ दोन दशके पत्रकारितेशी निगडित राजीव मसंद यांनी वयाच्या 16 व्या वर्षी या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. त्यांनी देशातील अनेक नामांकित मीडिया ग्रुप्ससोबत काम केले. 2020 मध्ये सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर त्याच्यावर एक नकारात्मक लेख लिहून त्याची बदनामी केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणात मसंद यांची मुंबई पोलिसांनी सुमारे 8 तास चौकशी केली होती.

राजीव मसंदवर गंभीर आरोप
चित्रपट समीक्षक राजीव मसंद बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांनी सुशांतच्या प्रत्येक सिनेमाची समीक्षा करताना मुद्दाम कमी रेटिंग देणे, सुशांतचा उल्लेख टाळणे अथवा त्याच्या
कामगिरीवर नकारात्मक भाष्य करणे असे प्रकार केले असल्याचा आरोप कंगनाने त्यांच्यावर केला होता.

बातम्या आणखी आहेत...