आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धाकड:चित्रपट सुपरफ्लॉप ठरल्यानंतर कंगना रनोटची सारवासारव, म्हणाली- 2022 हे वर्ष अजून संपलेले नाही

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मी आहे बॉक्स ऑफिस क्वीन

अभिनेत्री कंगना रनोटचा धाकड हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला आहे. हा चित्रपट त्याच्या निर्मिती खर्चापैकी 10 टक्केसुद्धा रक्कम वसूल करू शकला नाही. धाकड फ्लॉप झाल्यानंतर कंगनाला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले. मात्र, आता कंगनाने सोशल मीडियावर सारवासारव करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. 2022 हे वर्ष अजून संपलेले नाही, असं कंगना म्हणाली आहे.

मी आहे बॉक्स ऑफिसची क्वीन
कंगनाने आपल्या पोस्टमध्ये स्वतःला बॉक्स ऑफिसची राणी म्हटले आहे. ती लिहिते, "2019 मध्ये मी 160 कोटी रुपयांचा 'मणिकर्णिका' हा सुपरहिट चित्रपट दिला. 2020 हे कोविडचे वर्ष होते. त्यानंतर 2021 मध्ये, मी माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठा हिट चित्रपट 'थलायवी' दिला, जो OTT वर आला आणि यशस्वी झाला." कंगनाने पोस्टमध्ये पुढे लिहिले की, "सध्या माझ्याबद्दल खूप नकारात्मकता पसरवली जातेय. पण 2022 मध्ये लॉक अपचे होस्टिंग ब्लॉकबस्टर होते आणि हे वर्ष अजून संपलेले नाही. मला अजूनही खूप आशा आहेत."

OTT आणि सॅटेलाइट अधिकारांसाठी कोणतीही डील अद्याप मिळालेली नाही
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 8 व्या दिवशी भारतात धाकडची फक्त 20 तिकिटे विकली गेली होती. या चित्रपटाने यादिवशी फक्त 4,420 रुपयांची कमाई केली होती. चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरल्याचा थेट परिणाम त्याच्या सॅटेलाइट आणि ओटीटी राइट्सच्या डीलवर झाला आहे. असे सांगितले जात आहे की, 'धाकड' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला आहे आणि अशा परिस्थितीत निर्माते चित्रपटाचे सॅटेलाइट आणि डिजिटल अधिकार विकून चांगली कमाई करतील ही आशादेखील आता मावळली आहे. इतकंच नाही तर चित्रपटाच्या निर्मात्यांना OTT आणि सॅटेलाइट हक्कांसाठी अद्याप कोणतीही डील मिळालेली नाही. 'धाकड' हा अॅडल्ट चित्रपट असून तो टीव्हीवर दाखवण्यासाठी निर्मात्यांना पुन्हा प्रमाणपत्र घ्यावे लागेल, ही खूप मोठी प्रक्रिया आहे.

निर्माते अमेझॉनला हक्क विकण्याचा प्रयत्न करत आहेत
झी स्टुडिओजच्या माध्यमातून 'धाकड' चित्रपटगृहांमध्ये वितरित करण्यात आला आहे. झीचे व्हर्टिकल्स, झी 5 आणि झी सिनेमा या चित्रपटाचे ओटीटी आणि सॅटेलाइट हक्क विकत घेणार असल्याची चर्चा बाजारात होती. मात्र सूत्राने दावा केला आहे की, झी 5 हा चित्रपटाचा OTT पार्टनर नाही. त्यामुळे निर्माते अमेझॉन प्राइम व्हिडिओला हक्क विकण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दिवसांत, चित्रपटाच्या OTT आणि सॅटेलाइट हक्कांच्या डीलबाबतची माहिती समोर येईल. झी अजूनही टीव्ही आणि डिजिटल प्रीमियरसाठी बोर्डवर येऊ शकते अशी माहिती इंडस्ट्रीतील एका सूत्राने दिली आहे.

20 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता 'धाकड'
'धाकड'च्या निर्मात्यांना आता चित्रपटाचे हक्क कमी किमतीत विकून यावर तोडगा काढावा लागणार आहे. "धाकड' हा चित्रपट सुमारे 100 कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. निर्मात्यांना होणारे नुकसान खूप मोठे असेल," असे सूत्राने सांगितले. रजनीश घई दिग्दर्शित हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट 20 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. कंगनाशिवाय या चित्रपटात अर्जुन रामपाल, दिव्या दत्ता आणि शाश्वत चॅटर्जी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात कंगना एजंट अग्नीच्या भूमिकेत आहे. 'धाकड' हा कंगनाच्या करिअरमधील सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट ठरला आहे. पहिल्या दिवशीही या चित्रपटाने केवळ 75 लाखांचा व्यवसाय केला होता.

कंगनाचे प्रोजेक्ट्स
कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तिने आगामी पॉलिटिकल ड्रामा 'इमर्जन्सी' या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. याशिवाय ती 'तेजस'मध्ये दिसणार आहे. सोबतच तिच्याकडे 'मणिकर्णिका रिटर्न्स' आणि 'सीता' हे चित्रपटही आहेत.

बातम्या आणखी आहेत...