आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुक:एमी अवॉर्ड्समध्ये नामांकन मिळाल्याबद्दल कंगना रनोटने नवाजुद्दीन सिद्दीकीला दिल्या शुभेच्छा, म्हणाली - तुम्ही जगातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहात

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नेटफ्लिक्सवरील ‘सिरियस मॅन’ या चित्रपटासाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला सर्वोत्कृष्ट अभिनेता या श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे.

बॉलिवूडचा नावाजलेल्या अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला जगातील सर्वात मानाचा मानल्या जाणा-या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारासाठी नामांकन जाहीर झाले आहे. नवाजला हे नामांकन मिळाल्यानंतर सोशल मीडियावरुन त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. अभिनेत्री कंगना रनोट हिनेदेखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तुम्ही जगातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहात, अशा शब्दांत आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तुम्ही जगातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहात
नेटफ्लिक्सवरील ‘सिरियस मॅन’ या चित्रपटासाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला एमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता या श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे. नामांकन जाहीर झाल्यानंतर कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत नवाजला शुभेच्छा दिल्या आहेत. कंगनाने लिहिले, 'अभिनंदन सर, तुम्ही निश्चितपणे जगातील सर्वात्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहात.' या पोस्टसह तिने पृथ्वी इमोजी देखील दिला आहे.

नवाजने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याला नामांकित केल्याबद्दल आभार व्यक्त केले होते. त्याने पोस्टमध्ये लिहिले, 'व्व!!! #seriosumen मला एमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीत नामांकन मिळाले आहे. दिग्दर्शक सुधीर मिशरा आणि ‘सिरियस मॅन’च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन.' तसेच एका निवेदनात नवाज म्हणाला होता, "सुधीरसोबत काम करणे ‘सिरियस मॅन’मध्ये अय्यन मणीची भूमिका साकारणे हे माझ्यासाठी एक स्वप्न साकार झाल्यासारखे आहे. आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळणे म्हणजे चित्रपटासाठी केलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. मी नेटफ्लिक्स सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे आभार मानतो, जे जागतिक स्तरावर ओळखले जात आहेत."

71 व्या एमी पुरस्कार विजेत्यांची यादी 22 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...