आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महेश भट्टचे खरे नाव अस्लम, कंगना रनोटची आगपाखड:म्हणाली - ते आपले सुंदर नाव आणि खरी ओळख कशाला लपवत आहेत?

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री कंगना रनोट नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे इंडस्ट्रीत चर्चेत असते. आता पुन्हा एकदा तिने दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यावर निशाणा साधला आहे. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून महेश भट्ट यांचे जुने व्हिडिओ शेअर करत तिने त्यांचे खरे नाव अस्लम असल्याचे सांगितले आहे. ते त्याचे सुंदर नाव का लपवत आहेत? असा प्रश्नही तिने महेश भट्ट यांना विचारला आहे. व्हिडिओत महेश भट्ट म्हणाले होते की, घाबरलेला माणूस मुस्लिम असू शकत नाही.

जिथे इस्लाम आहे तिथे भीती नाही - महेश
महेश भट्ट यांचा हा व्हिडिओ मुंबईतील जमिएत एहले हदीस येथील कार्यक्रमातील आहे. हा व्हिडिओ शेअर करत कंगनाने लिहिले - "महेशजी सहजपणे आणि काव्यात्मकदृष्ट्या लोकांना हिंसेसाठी प्रवृत्त करत आहेत." व्हिडिओमध्ये महेश म्हणताहेत, मी इस्लामबद्दल जे काही वाचले आहे, मला एकच गोष्ट समजली आहे की घाबरणारा माणूस मुस्लिम असू शकत नाही.

व्हिडिओमध्ये महेश पुढे म्हणाले होते की, जिथे भीती आहे तिथे इस्लाम नाही आणि जिथे इस्लाम आहे तिथे भीती नाही. अगदी त्याचप्रमाणे जेथे प्रकाश आहे तेथे अंधार असू शकत नाही. माझे प्रिय मित्र महमूद मदनी साहब यांनी माझ्याकडून एक हदीस लिहून घेतली होती जी माझ्या कॉम्प्युटरवर आहे.

महेश भट्ट यांनी आपली ओळख लपवू नये: कंगना
कंगनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले - 'मला सांगण्यात आले आहे की, त्यांचे खरे नाव महेश भट्ट नसून अस्लम आहे. त्यांनी आपली दुसरी पत्नी, सोनी राझदानशी लग्न करण्यासाठी धर्मांतर केले. अस्लम हे एक सुंदर नाव आहे, ते लपवायचे कशाला?' कंगनाने आणखी एक क्लिप शेअर केली. ही क्लिप शेअर करत तिने लिहिले, 'महेश यांनी आपले खरे नाव वापरावे. जेव्हा त्यांनी स्वतः धर्मांतर केले आहे तेव्हा विशिष्ट धर्माचे प्रतिनिधित्व करू नये.'

महेश हे चित्रपट माफिया - कंगना
कंगनाचा महेश भट्टसोबतचा वाद बराच जुना आहे. 2020 मध्ये महेश भट्ट यांची मुलगी आणि अभिनेत्री-निर्माती पूजा भट्टच्या धोका चित्रपटाची ऑफर कंगनाने नाकारली होती. यानंतर तिने महेश भट्ट यांच्यावर मारहाणीचा आरोप केला होता. तर गंगूबाई काठियावाडी चित्रपटाच्या रिलीजआधी कंगनाने चुकीची कास्टिंग असे म्हटले होते. या चित्रपटात महेश भट्ट यांची मुलगी आलिया भट्टने मुख्य भूमिका साकारली होती. कंगनाने नेहमीच महेश यांना चित्रपट माफियाचा टॅग देत आली आहे.

भट्ट कॅम्पमुळे कंगनाला मिळाली ओळख
कंगनाने 2006 मध्ये महेश भट्ट यांच्या 'गँगस्टर' या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. कंगनाने वो लम्हे आणि राज: द मिस्ट्री कंटिन्यूज सारख्या चित्रपटात काम केले. बॉलिवूडमध्ये कंगनाच्या ओळख मिळवून देण्याचे श्रेय भट्ट कॅम्पच्या चित्रपटांना दिले जाते.

बातम्या आणखी आहेत...