आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगनाची फॅन फॉलोइंग वाढली:ट्विटरवर कंगना रनोटचे झाले 3 मिलियन फॉलोअर, सुशांतच्या निधनानंतर जुलै 2020 पासून वाढतेय फॉलोअर्सची संख्या

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाने आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. नेहमीच या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बॉलिवूड असो वा राजकारण, ती आपले रोखठोक मत मांडताना दिसत असते. यामुळे अनेकदा ती वादातही सापडली आहे. तिने ट्विटरवर केलेले ट्विट्स चर्चेत राहतात. अलीकडेच कंगनाचे ट्विटरवर 3 मिलियन (30 लाख) फॉलोअर्स झाले आहेत. याबद्दल कंगनाने आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

कंगनाने स्वत :याबद्दल माहिती दिली आणि यूजर्सचे आभार मानले आहेत. कंगनाने याबद्दलची पोस्ट शेअर केली आहे आणि लिहिले, 'मी ऑगस्टमध्ये ट्विटरवर आले होते. काही दिवसांपूर्वी मला फॉलो करणारे फक्त हजारांमध्ये होते. आणि माझी टीम ट्विटर अकाउंट हँडल करत होती. त्यावेळी एवढ्या लवकर आम्ही 30 लाखांचा आकडा पार करु, याचा विचारदेखील केला नव्हता. मी ट्विटरवर बराच वेळ घालवला आहे आणि तो मजेदार आहे, सर्वांचे आभार,' अशी पोस्ट कंगनाने लिहिली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर जुलै 2020 पासून कंगनाच्या सोशल मीडिया फॉलोअर्सची संख्या वाढत आहे. कंगनाने सुशांतच्या मृत्यूवर अनेक लोकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तिने सुशांत प्रकरणाचा सीबीआय तपास व्हावा, म्हणून मागणी केली होती. त्यानंतर कंगनाला चाहत्यांचा पाठिंबा मिळत आहे.

दररोज ट्विटरवर कंगना कुणाशी तरी पंगा घेताना दिसत असते. अलीकडेच काँग्रेस नेते शशी थरुर यांच्याशी तिची शाब्दिक चकमक रंगली होती. याशिवाय शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि पंजाबी अभिनेता दिलजीत दोसांज यांच्याशी सुद्धा तिचा चांगलाच वाद रंगला होता. त्यामुळे ती चर्चेत राहिली.

कंगनाचा 'थलायवी' लवकरच होणार प्रदर्शित

कंगना गेल्या अनेक दिवसांपासून मनालीमध्ये आपल्या कुटूंबियांसह सुट्टीचा आनंद घेत होती. मनाली हे तिचे होम टाऊन आहे. आता कंगना मुंबईला परतली आहे. मुंबई आल्यानंतर तिने सर्वप्रथम सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणेशाचा आशीर्वाद घेतला होता. याचे फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मुंबईत परतण्यापूर्वी कंगना तिच्या आगामी ‘थलायवी’ (जयललिता यांचा बायोपिक) चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. ज्याचे शूटिंग आता पूर्ण झाले असून हा चित्रपट लवकरच हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

कंगनाचे अपकमिंग प्रोजेक्ट्स

नवीन वर्षात कंगनाच्या हाती अनेक प्रोजेक्ट्स आहेत. अलीकडेच तिने सोशल मीडियावर सांगितले होते की, ती तिच्या आगामी ‘धाकड’ चित्रपटाची तयारी करत आहे. 2021 च्या जानेवारीच्या सुरुवातीला ती शुटिंगला सुरुवात करणार आहे. या स्पाय थ्रिलर चित्रपटात कंगना एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगनाने तिच्या चित्रपटाच्या तयारीचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोमध्ये कंगना प्रोस्थेटिक मेजरमेंट देताना दिसली होती. यापूर्वी 'थलायवी' चित्रपटातही कंगनाने ही प्रक्रिया वापरली होती. 'धाकड'च्या तयारीशिवाय कंगना सध्या' तेजस 'चित्रपटाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे.

बातम्या आणखी आहेत...