आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगना vs दिलजीत:शेतकऱ्यांवर टीका करणाऱ्या कंगनाला दिलजीतचं प्रत्युत्तर, म्हणाला - तुला हे दहशतवादी वाटतात का?

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिलजीतने कंगनाला प्रत्युत्तर दिले आहे.

शेतकरी आंदोलनावरुन पुन्हा एकदा कंगना रनोट आणि दिलजीत दोसांज समोरा समोर आले आहेत. दोघांमधील वाद शमण्याची अद्याप चिन्ह दिसत नाहीयेत. शुक्रवारी कंगनाने दिलजीत दोसांजसह प्रियांका चोप्रावर शेत-यांना भडकवण्याचा प्रयत्न करत असताना दावा केला. मात्र तिच्या आरोपांवर दिलजीतने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शेतकरी तुला दहशतवादी वाटतात का? असा सवाल त्याने कंगनाला केला आहे.

“तुझं काय चाललं आहे तुलाच माहिती. हे देवासारखी लोकं तुला दहशतवादी वाटतात का? माणूसकी नावाची देखील काही गोष्ट असते.” अशा आशयाची पोस्ट करुन दिलजीतने कंगनाला प्रत्युत्तर दिले आहे.

यापूर्वी काय म्हणाली होती कंगना?

कंगनाने एक व्हिडिओ शेअर करत लिहिले, ‘ मला वाटतं दिलजीत आणि प्रियांका चोप्रा जे दोघे शेतकऱ्यांसाठी स्थानिक क्रांतिकारक म्हणून पुढे आले, त्यांनी आता कमीत कमी एक व्हिडिओ करत शेतकऱ्यांना हे सांगावे की, आंदोलन कशासाठी करावे. हे दोघंही शेतकऱ्यांना भडकवून गायब झाले आहेत, आणि पाहा शेतकऱ्यांची आणि देशाची आता काय परिस्थिती झाली.’दिलजीतने कंगनाला उत्तर देत ‘शेपूट सरळ होऊ शकत नाही’, असे म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...