आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Kangana Ranaut Express Her Anger On Movie Mafia Of Bollywood Writes, Emotional, Psychological, And Mental Lynching On An Individual Happens Openly And We All Are All Guilty Of Watching It Silently.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगनाचा नवा आरोप:सुशांतची आत्महत्या नव्हे हत्या, म्हणाली -  भावनिक आणि मानसिक लिंचिंगमुळे गेला सुशांतचा जीव 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गिधाडं, घारी आणि कावळ्यांच्या रुपात काही मुव्ही माफियांनी त्यांचे पत्रकार पाळले आहेत, असे कंगना म्हणाली आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अभिनेत्री कंगना रनोट पुन्हा एकदा मुव्ही माफियांवर भडकली आहे. शुक्रवारी तिचा आणखी एक व्हिडीओ सोशल तिच्या टीमने सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.  यात तिने आरोप केला की,  सुशांतचा बळी हा इमोशनल, सायकोलॉजिकल आणि मेन्टल लिंचिंगमुळे गेला आहे.  

व्हिडीओ शेअर करुन कंगनाच्या टीमने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'एखाद्या व्यक्तीची इमोशनल, सायकोलॉजिकल आणि मेन्टल लिंचिंग होते आणि आपण सगळे गप्प राहून ते बघत असतो. यासाठी फक्त सिस्टमला दोष देणे योग्य होईल काय? कधी बदल होईल का? बाहेरील लोकांशी कसे वागले जाते  हे या कहाणीत आपण महत्त्वपूर्ण बदल पाहणार आहोत का? 

कंगनाने सांगितले अनुभव

व्हिडीओत कंगना आपला मुद्दा मांडताना म्हणाली, 'सुशांतसिंग राजपूतच्या हत्येनंतर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. काही गोष्टी मी वाचल्या तर काही मी पाहिल्या आणि ऐकल्या आहेत. बॉलिवूडमध्ये त्याच्यासोबत जे काही घडत होते त्यामुळे तो त्रस्त झाला होता असे सुशांतच्या वडिलांनी एका मुलाखतीत सांगितले', असे कंगना म्हणाली. 

दिग्दर्शक आणि पुर्वाश्रमीच्या गर्लफ्रेंडचा केला उल्लेख 

'अभिषेक कपूर या दिग्दर्शकासोबत सुशांतने केदारनाथ नावाचा सिनेमा केला होता. त्यांनी असे म्हटले आहे की सुशांतचे मानसिक आरोग्य हळूहळू बिघडवण्यात आले. तर अंकिता लोखंडे जी सुशांतसोबत दीर्घकाळ होती, तिने सुशांत सामाजिक स्तरावर त्याचा झालेला अपमान आणि बदनामी सहन करु शकला नाही असे म्हटले आहे.'

कंगनाचा मुव्ही माफियांवर हल्लाबोल 

कंगनाने मुव्ही माफियांवर निशाणा साधला. ती म्हणाली, 'बॉलिवूडच्या मू्व्ही माफियांनी अत्यंत पद्धतशीरपणे सुशांतची बदनामी केली. त्याचे नाव न घेता त्याला अप्रत्यक्षपणे वाळीत टाकण्याचे प्रकार सुरु केले. ज्यामुळे हळूहळू सुशांत नैराश्याच्या गर्तेत ढकलला गेला. अनेक सो कॉल्ड पत्रकारांनी त्याच्याबद्दलच्या खोट्या बातम्याही पसरवल्या.'

सुशांतवर लिहिलेलेल्या ब्लाइंड्सविषयी सांगितले 

यानंतर कंगनाने काही मीडिया हाऊसेसच्या नावाचा उल्लेख करुन सुशांतविषयी लिहिल्या गेलेल्य ब्लाइंड्सविषयी सांगितले. ती म्हणाली, 'ब्लाईंडली लिहिणे म्हणजे माझ्याबद्दल लिहायचे असेल तर जिचे कुरळे केस आहेत, ती मनालीची आहे, सायको आहे असे लिहितात. कारण या लोकांना खरं छापायचे नसते असे अगणित आरोप सुशांतवर करण्यात आले आहेत. गिधाडं, घारी आणि कावळ्यांच्या रुपात काही मुव्ही माफियांनी त्यांचे पत्रकार पाळले आहेत. ज्यांनी सुशांतची यथेच्छ बदनामी केली. ज्याचा त्रास त्याला होऊ लागला. हे असले पत्रकार मेन्टल, इमोशनल, सायकोलॉजिकल लिंचिंगलाच त्यांची पत्रकारिता मानतात', असे रोखठोक मत तिने व्यक्त केले. 

  

बातम्या आणखी आहेत...