आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी कायदे मागे घेतल्याने कंगना रनोट संतापली:कंगना म्हणाली - हे दुःखद, लज्जास्पद, अन्यायकारक आहे, रस्त्यावरचे लोक कायदे करु लागले तर...

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकारचा हा निर्णय दुःखद, लज्जास्पद आणि अन्यायकारक असल्याचे कंगनाने म्हटले आहे.

तीन वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला यश मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हे तीन कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा केली आहे. लवकरच याबाबतची संविधानिक प्रक्रियाही सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र सरकारच्या या निर्णयामुळे अभिनेत्री कंगना रनोट नाराज आहे. सरकारचा हा निर्णय दुःखद, लज्जास्पद आणि अन्यायकारक असल्याचे तिने म्हटले आहे.

कंगनाने शेअर केली पोस्ट
कंगनाने तिच्या पोस्टमध्ये एका ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि लिहिले, "दुःखद, लज्जास्पद आणि अन्यायकारक. संसदेत निवडून आलेले सरकार नव्हे तर रस्त्यावरचे लोक कायदे करु लागले तर ते एक जिहादी राष्ट्र आहे. ज्यांना हे हवे होते त्या सर्वांचे अभिनंदन," अशा शब्दांत कंगनाने आपला संताप व्यक्त केला आहे.

दुसरीकडे दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा फोटो शेअर करत कंगनाने लिहिले, "जेव्हा देशाची सद्सद्विवेकबुद्धी गाढ झोपेत असते, तेव्हा लाठीमार हाच एकमेव उपाय असतो आणि हुकूमशाही हाच एकमेव संकल्प... पंतप्रधानांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा." माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज 104 वी जयंती आहे.

पंतप्रधानांनी निर्णय घेतला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशाला संबोधित केले. या भाषणात मोदींनी तीनही नवीन कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली. आपल्या 18 मिनिटांच्या भाषणात ते म्हणाले की, 'सरकारने तीनही कृषी कायदे चांगल्या हेतूने आणले आहेत, परंतु आम्ही शेतकऱ्यांना हे समजावून सांगू शकलो नाही. आमच्या सरकारने शेतकर्‍यांसाठी, विशेषत: छोट्या शेतकर्‍यांच्या हितासाठी, शेतकर्‍यांप्रती पूर्ण निष्ठेने हा कायदा आणला होता, परंतु आम्ही प्रयत्न करूनही काही शेतकर्‍यांना तो समजावून सांगू शकलो नाही. आम्ही शेतकर्‍यांना अत्यंत नम्रतेने समजावत राहिलो. संवाद चालूच होता. शेतकऱ्यांचा दृष्टिकोन समजून घेण्यात आम्ही कोणतीही कसर सोडली नाही. ज्या कायद्यावर त्यांचा आक्षेप होता, त्या कायद्यातील तरतुदी बदलण्याचे सरकारने मान्य केले. मित्रांनो, आज गुरु नानक देवजींचा पवित्र सण आहे, ही वेळ कोणाला दोष देण्याची नाही. मी आज संपूर्ण देशाला कळवण्यासाठी आलो आहे की, आम्ही तीनही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्यात आम्ही ते परत घेण्याची प्रक्रिया पूर्ण करू.'

बातम्या आणखी आहेत...