आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वजन कमी करण्याच्या मार्गावर कंगना रनोट:'थलाइवी'साठी कंगनाने वाढवले होते 20 किलो वजन, आता पुर्वासारखा फिटनेस मिळवण्यासाठी सकाळी करतेय जॉगिंग

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'थलाइवी'साठी कंगनाने 70 किलोपर्यंत आपले वजन वाढवले होते.

अभिनेत्री कंगना रनोट सध्या जयललिता यांच्या जीवनावर आधारित 'थलाइवी'च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटासाठी कंगनाने आपले 20 किलो वजन वाढवले ​​होते. कंगना आता आपले वाढलेले वजन कमी करत आहे. यासंदर्भात तिने नुकतेच एक ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये तिने लिहिले की, "थलाइवीसाठी मी 20 किलो वजन वाढवले होते. आता चित्रीकरण पूर्ण होत आले आहे, तर आपला पुर्वाचा आकार, चपळाई, मेटोबॉलिज्म आणि लवचिकता मिळवण्याची गरज आहे. लवकर उठणे आणि मग जॉगिंग करणे / फिरायला जाणे. कोण-कोण माझ्यासोबत आहेत?," अशा आशयाचे ट्विट कंगनाने केले होते.

अलीकडेच पूर्ण झाले एक शेड्युल

कंगनाने 11 ऑक्टोबर रोजी 'थलाइवी'च्या सेटवरून तिचे काही फोटो शेअर केले होते. तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते, "जया मांच्या आशीर्वादाने 'थलाइवी-द रेव्होल्यूशनरी लीडर'चे शेड्युल पूर्ण झाले आहे. कोरोना नंतर बर्‍याच गोष्टी वेगळ्या आहेत. धन्यवाद टीम." आपले हे ट्विट तिने चित्रपटाचे निर्माते विष्णू वर्धन इंदुरी, शैलेश आर सिंग आणि ए.एल. विजय यांना टॅग केले होते.

'थलाइवी' तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे

'थालाइवी' हा चित्रपट तमिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या आयुष्यावर बेतला आहे. हा चित्रपट हिंदीसह तामिळ आणि तेलगू भाषांमध्ये रिलीज होणार आहे. ए. एल विजय दिग्दर्शित हा चित्रपट 26 जून रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु लॉकडाऊनमुळे 7 महिने त्याचे चित्रीकरण होऊ शकले नाही. त्यामुळे, प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली. 4 ऑक्टोबरला कंगनाने पुन्हा चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.

चित्रपट डिजिटली रिलीज होणार नसल्याचे कंगनाने केले स्पष्ट
मध्यंतरी 'थलाइवी' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची शक्यता वर्तवली गेली होती. मात्र कंगनाने याचे खंडन केले होते. एका मुलाखतीत ती म्हणाली होती की, "थलाइवी डिजिटली प्रदर्शित होऊ शकत नाहीत. कारण हा एक मोठ्या स्तरावरचा चित्रपट आहे."

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser