आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Kangana Ranaut Gave Clarification On Calling Swara And Taapsee Pannu As B Grade Actresses, Saying 'People Never Consider Them Equal To Alia And Ananya'

वादग्रस्त वक्तव्यावरचे स्पष्टीकरण:स्वरा आणि तापसी पन्नू यांना बी-ग्रेड अभिनेत्री म्हणून संबोधण्याबाबत कंगना रनोटने दिले स्पष्टीकरण, म्हणाली...

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाच्या मते, लोक स्वरा आणि तापसीला आलिया आणि अनन्याच्या तोडीचे समजत नाहीत.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर अभिनेत्री कंगना रनोटने इंडस्ट्रीतील अनेक बड्या व्यक्तींवर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, एका मुलाखतीत कंगनाने अभिनेत्री स्वरा भास्कर आणि तापसी पन्नू यांना बी ग्रेड अभिनेत्री म्हणून संबोधले होते. त्यानंतर ती पुन्हा चर्चेत आली. तेव्हापासून ट्विटरवर जणू युद्धच सुरु झाले होते. आता कंगनाने आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. तिच्या म्हणण्यानुसार, लोक स्वरा आणि तापसी यांना आलिया आणि अनन्याच्या तोडीचे समजत नाहीत, म्हणून त्या बी ग्रेड अभिनेत्री आहेत.

लोक स्वरा आणि तापसीला आलियाच्या तोडीचे नाही समजत : कंगना

आपल्या वक्तव्यावर टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली, स्वरा भास्कर आणि तापसी पन्नू यांनी कितीही मेहनत केली तरी त्यांना कधीच आलिया किंवा अनन्याच्या तोडीचे समजले जाणार नाही. ती म्हणाली, 'मला त्यांना हे समजावून सांगायचे आहे. जेव्हा स्वरा सांगते की ती सोनम कपूरची सर्वात चांगली मैत्रीण आहे, तेव्हा जग तिला तिच्यासारखे मानत नाही. लोक माझ्यावर खूप प्रेम करतात आणि मला इंडस्ट्रीमध्ये समान संधी मिळाल्या आहेत, असे तापसी कितीही सांगत असली, तरीही लोक आलिया भट्ट आणि अनन्या पांडे यांच्यासारखा तिच्याबद्दल कधीही विचार करणार नाहीत. हीच गोष्ट मला दोघींना पटवून द्यायची आहे', असे कंगना म्हणाली.

ती पुढे म्हणाली, 'तुम्ही कितीही कठोर परिश्रम करा पण तुम्हाला ते स्थान मिळत नाहीये. जर तुम्हाला ते दिसत नसेल तर मी तुम्हाला दाखवीन. इनसाइडर्ससाठी तुम्ही बी-ग्रेडच आहात. मी या वाटेवरुन गेले आहे. त्यामुळे मला माहित आहे की हे काय आहे? म्हणून मला हे समजावून सांगायचे होते. जर तुम्हाला वाटतं असेल की, तुम्ही तुमची जागा निर्माण केली आणि इनसाइडर आहात, तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात', असे मत कंगनाने व्यक्त केले.