आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोशल मीडिया वॉर:शेतकरी आंदोलनाला पॉप स्टार रिहानाने दिला पाठिंबा, भडकलेली कंगना रनोट म्हणाली - 'आम्ही तुझ्यासारखे मुर्ख नाहीत'

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट हिने व्यक्त केला संताप

तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर शेतकरी मागील दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सिंघू, गाजीपूर आणि टिकरी सीमांवर शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलनाची देशभरात चर्चा आहे. इतकेच नाही तर हा आता आंतरराष्ट्रीय मुद्दा बनला आहे. अनेकांनी या आंदोलनावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या आंदोलनावर आता आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहाना हिनेही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मात्र तिच्या प्रतिक्रियेवर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट हिने नाराजी व्यक्त केली आहे.

नेमके काय झाले?
रियानाने 2 फेब्रुवारी रोजी भारतातल्या शेतकरी आंदोलनासंबंधी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपला पाठिंबा दर्शवला. एका बातमीची लिंक शेअर करत तिने लिहिले की, "आपण या विषयावर का बोलत नाही?" या पोस्टसह तिने #FarmersProtest हा हॅशटॅगही वापरला आहे.

मात्र, अभिनेत्री कंगना रनोट हिने रिहानाच्या पोस्टवर टीका करत तिची गणना मुर्खांमध्ये केली आहे. कंगनाने लिहिले, "कुणीच याविषयी बोलत नाही कारण ते शेतकरी नव्हे अतिरेकी आहेत. ते भारताला कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहेत. जेणेकरून चीनसारखे देश आपल्या देशावर ताबा मिळवतील आणि अमेरिकेसारखी चिनी वसाहत बनवतील. तू शांत रहा, आम्ही तुझ्यासारखे मुर्ख नाही, जो आमचा देश विकू”, असे सणसणीत प्रत्युत्तर कंगनाने रिहानाला दिला आहे.

दरम्यान, कंगनाच्या या ट्विटची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे रिहानाच्या या पोस्टवर आतापर्यंत 66.9 हजारांहून अधिक प्रतिक्रिया आल्या आहेत. 14 हजारांहून अधिक लोकांनी हे ट्वीट रिट्वीट केले आहे. तर 154.4 हजार लोकांनी या ट्वीटला लाईक केले आहे. भारतात रिहाना टॉप ट्वीटर ट्रेंड आहे.

बातम्या आणखी आहेत...