आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्वीनची लक्झरी भेट:चंडीगडमध्ये कंगना रनोटने 4 कोटींमध्ये खरेदी केले 4 फ्लॅट्स, सख्या बहीणभावांसह दोन चुलतभावांना केले गिफ्ट

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाने आपल्या भावंडांसाठी चार कोटींमध्ये हे चार आलिशान फ्लॅट्स खरेदी केले आहेत.

सध्या मध्य प्रदेशात 'धाकड' या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी असलेली कंगना रनोट हिने तिचा भाऊ अक्षत, बहीण रंगोली चंदेल आणि दोन चुलतभावांसाठी चंदीगडमध्ये फ्लॅट खरेदी केले असून ते त्यांना गिफ्ट म्हणून दिले आहेत. रिपोर्ट्सनुसार कंगनाने आपल्या भावंडांसाठी चार कोटींमध्ये हे चार आलिशान फ्लॅट्स खरेदी केले आहेत.

हे चारही फ्लॅट विमानतळाजवळ आहेत
एका इंग्रजी न्यूज वेबसाईटने सूत्रांच्या हवाल्याने लिहिले, 'कंगना नेहमीच तिच्या भावंडांसाठी सपोर्टिव्ह असते. तिने ते पुन्हा ते सिद्ध केले आहे. चंदीगडच्या पॉश भागात कंगनाने तिच्या भावंडांना लक्झरी फ्लॅट्स भेट म्हणून दिले आहेत. हे चारही फ्लॅट्स चंडिगड विमानतळाजवळील हाय स्ट्रीट एरियात आहे. येथे जवळपास चांगले मॉल्स आणि रेस्तराँ आहेत.'

भावंडांचे स्वप्न पूर्ण केले
रिपोर्टमध्ये पुढे म्हटले आहे की, "हिमाचल प्रदेशातील लोक नेहमीच चंडीगडमध्ये घर विकत घेण्याचे स्वप्न पाहतात आणि कंगनाचे हे पाऊल उचलून तिच्या भावंडांचे स्वप्न पूर्ण केले आहे."

कंगना रनोट हिनेही केली पुष्टी
कंगनाने सोशल मीडियावर या गोष्टीची पुष्टी करत लिहिले की, "मी लोकांना त्यांची संपत्ती कुटुंबासह वाटण्यासाठी प्रोत्साहित करू इच्छित आहे. लक्षात ठेवा जेव्हा आनंद शेअर केला जातो तेव्हा तो अनेक पटीने वाढते. ते सुंदर लग्झरी अपार्टमेंट्स आहेत. त्याचे काम सुरु असून 2023 मध्ये तयार होतील. माझ्या कुटुंबासाठी मी हे करु शकले हे माझे भाग्य आहे."

कंगना रनोटचे आगामी प्रोटेक्ट्स
यावर्षी कंगना रनोटचा 'थलायवी' हा चित्रपट रिलीज होणार आहे, जो तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित आहेत. 'धाकड'चे शूटिंग सुरू आहे. यानंतर, ती 'तेजस'च्या शूटिंगला सुरूवात करेल. याशिवाय तिने 'अपराजित अयोध्या', 'मणिकर्णिका रिटर्न्स: द लीजेंड ऑफ दिड्डा' आणि काश्मिरी पंडितांवरील अत्याचारांवर आधारित अद्याप शीर्षक न ठरलेल्या चित्रपटाची घोषणा केली आहे. याशिवाय ती एका चित्रपटात इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...