आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रोलर्सच्या निशाण्यावर कंगना:बिकिनी फोटो शेअर करणा-या कंगना रनोटवर संतापले नेटकरी, म्हणाले -  'हीच का हिंदू संस्कृती?'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काहींनी तिच्या या फोटोवर संताप व्यक्त केला तर काहींनी तिची खिल्ली उडवली आहे.

आपल्या वक्तव्यांमुळे कायम वादात राहणारी अभिनेत्री कंगना रनोट हिने बुधवारी सोशल मीडियावर आपला बिकिनीतील एक फोटो शेअर केला आहे. यात ती समुद्रकिनारी बसलेली दिसत आहे. मात्र या फोटोमुळे ती वादात सापडली आहे. सोशल मीडिया यूजर्स तिला यामुळे ट्रोल करत आहेत. काहींनी तिच्या या फोटोवर संताप व्यक्त केला तर काहींनी तिची खिल्ली उडवली आहे. एका नेटक-याने म्हटले की, जिने झाशीच्या राणीची भूमिका वठवली, तिच्याकडून शिकायला हवे, असे म्हणत तिला टोला लगावला आहे.

मॅक्सिकोच्या बेटावर काढला होता फोटा
हा फोटो कंगनाच्या मॅक्सिको ट्रीपदरम्यानचा आहे. फोटो शेअर करत कंगनाने लिहिले, “सुप्रभात मित्रांनो, सध्या जगातील सर्वात सुंदर देशांपैकी एक मॅक्सिको येथे आहे. सुंदर आणि कल्पनेच्या पलिकडलं ठिकाण. मॅक्सिकोमधील एका बेटावर मी हा फोटो काढला आहे.” अशा आशयाची पोस्ट तिने शेअर केली.

कंगनाने यापूर्वी अनेक सेलिब्रिटींच्या ड्रेसिंग सेन्सवरुन त्यांच्यावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर तिचा हा बिकिनी अवतार पाहून हीच का हिंदू संस्कृती? असा टोला काही नेटकऱ्यांनी लगावला आहे.

काही नेटक-यांच्या प्रतिक्रिया

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser