आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगनाचा पलटवार:बिकिनी फोटोवरुन ट्रोल करणा-यांना कंगनाने सुनावले खडे बोल, म्हणाली - धर्माच्या मार्गाने चला, धर्माचे ठेकेदार बनू नका…

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाने अशा लोकांना धर्माच्या मार्गावर चालण्याचा सल्ला दिला आहे.

बिकिनी फोटोवरुन ट्रोल करणा-यांना अभिनेत्री कंगना रनोटने चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. कंगनाने बुधवारी सोशल मीडियावर आपला बिकिनीतील एक फोटो शेअर केला आहे. यात ती समुद्रकिनारी बसलेली दिसत आहे. मात्र या फोटोमुळे ती वादात सापडली. सोशल मीडिया यूजर्सनी तिच्या या फोटोवर संताप व्यक्त केला तर काहींनी तिची खिल्ली उडवली आहे. एका नेटक-याने म्हटले की, जिने झाशीच्या राणीची भूमिका वठवली, तिच्याकडून शिकायला हवे, असे म्हणत तिला टोला लगावला आहे.

आता यावर कंगनाने अशा लोकांना धर्माच्या मार्गावर चालण्याचा सल्ला दिला आहे. ती म्हणाली, ''काही लोक माझे बिकिनीवरचा फोटो पाहून मला धर्म आणि सनातनचे लेक्चर देत आहेत, कधी देवी भैरवीची केस मोकळे सोडलेले वस्त्रहीन, रक्त पिणारी छवी तुमच्या समोर आली तर तुमचे काय होईल, तुमची तर फाटेलच, स्वत: भक्त समजत असाव तर धर्माच्या मार्गाने चला, धर्माचे ठेकेदार बनू नका…जय श्री राम.'' अशा आशयाची पोस्ट करत कंगनाने ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिले आहे.

मॅक्सिकोच्या बेटावर काढला होता फोटा
हा फोटो कंगनाच्या मॅक्सिको ट्रीपदरम्यानचा आहे. फोटो शेअर करत कंगनाने लिहिले, “सुप्रभात मित्रांनो, सध्या जगातील सर्वात सुंदर देशांपैकी एक मॅक्सिको येथे आहे. सुंदर आणि कल्पनेच्या पलिकडलं ठिकाण. मॅक्सिकोमधील एका बेटावर मी हा फोटो काढला आहे.” अशा आशयाची पोस्ट तिने शेअर केली.

कंगनाने यापूर्वी अनेक सेलिब्रिटींच्या ड्रेसिंग सेन्सवरुन त्यांच्यावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर तिचा हा बिकिनी अवतार पाहून हीच का हिंदू संस्कृती? असा टोला काही नेटकऱ्यांनी लगावला आहे.

काही नेटक-यांच्या प्रतिक्रिया

बातम्या आणखी आहेत...