आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोशल मीडिया वॉर:कंगनाने शाहीन बाग आंदोलनाची केली शेतक-यांच्या आंदोलनाशी तुलना, गायक जस्सीने अभिनेत्रीला म्हटले - चापलूस आणि निर्लज्ज

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जस्सीने कंगनासाठी चापलूस आणि निर्लज्ज अशा शब्दांचा वापर केला.

शेतकरी आंदोलनावरुन अभिनेत्री कंगना रनोट आणि गायिक जसबीर जस्सी सोशल मीडियावर आमनेसामने आले आहेत. कंगनाने आपल्या एका पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थन करत शेतक-यांच्या आंदोलनाची तुलना शाहीन बागसोबत केली होती. शाहीन बागेत रक्ताचे सडे पाडणा-यांना ठाऊक होते की कोणीही त्यांचे नागरिकत्व काढून घेत नाहीये, अशी पोस्ट कंगनाने टाकली होती. त्यावर जस्सीने कंगनासाठी चापलूस आणि निर्लज्ज अशा शब्दांचा वापर केला.

कंगना रनोटची पोस्ट

जस्सीने काय लिहिले?

जस्सीला कंगनाचे उत्तर

कंगनाने जस्सीच्या पोस्टला उत्तर देताना, तुला एवढा राग का आला?, असा प्रश्न विचारला. सोबतच कृषी विधेयक शेतक-यांच्या बाजूने असल्याचे सांगत जस्सीला विचारले की, "मी तर शेतक-यांच्या हक्कांबद्दल बोलत आहे. पण तू कोणाच्या हक्कांबद्दल बोलतोय?"

हिमांशी खुराणानेही कंगनावर जोरदार हल्लाबोल केला
शेतकरी आंदोलनावर सरकारची बाजू घेतल्याबद्दल 'बिग बॉस 13' ची स्पर्धक हिमांशी खुराणा हिनेदेखील कंगनाला फटकारले. खरं तर, कंगनाने तिच्या एका पोस्टमध्ये शेतकरी आंदोलनात सामील वृद्ध महिलेला शाहीन बागची दादी म्हटले होते. सोबत ही आजी 100 रुपयांसाठी कोणत्याही आंदोलनात सहभागी होते, असे वक्तव्य कंगनाने केले होते.

त्याच पोस्टवर हल्ला चढवत हिमांशीने लिहिले, "जर वृद्ध महिलेने गर्दीत सामील होण्यासाठी पैसे घेतले असतील तर ... सरकारच्या बचावासाठी आपण किती पैसे घेतले?"

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser