आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगना रनोटचा पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर निशाणा:मुंबई पोलिसांनी समन्स पाठवल्यानंतर कंगना म्हणाली - पेंग्विन सेनेला माझी फार आठवण येतेय, मी लवकरच येईल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे.

धर्माच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रनोट आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी दोघींना समन्स बजावले आहे. येत्या 26 आणि 27 ऑक्टोबर रोजी दोघींना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानंतर आता कंगनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे.

कंगनाने महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधत पोलिसांच्या समन्सला उपरोधिकपणे उत्तर दिले आहे. तिने ट्विटमध्ये म्हटले, "पेंग्विन सेना.. महाराष्ट्रातील पप्पूप्रो... त्यांना माझी खूप आठवण येतेय. क-क-क-क-क-कंगना. काही हरकत नाही... मी लवकरच येणार आहे", असे तिने म्हटले आहे.

  • 26 आणि 27 ऑक्टोबर रोजी दोन्ही बहिणींना हजर व्हावे लागेल

17 ऑक्टोबरला वांद्रे पोलिस ठाण्यात कंगना आणि रंगोलीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना समन्स बजावत 26 ऑक्टोबरला कंगनाला आणि 27 ऑक्टोबरला रंगोलीला चौकशीसाठी बोलावले आहे. सध्या दोघीही त्यांचा सख्खा भाऊ अक्षत आणि कजिन करणच्या लग्नाच्या निमित्ताने हिमाचलच्या आपल्या घरी आहेत.

कंगना रनोटवर काय आहेत आरोप?

वकील साहिल अशरफ अली सय्यद यांनी वांद्र्यातील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात कंगनाविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर कोर्टाने दोघींवर गुन्हा दाखल करुन तपासाचे आदेश दिले होते. या आदेशावरुन वांद्रे पोलिसांत या दोघींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या याचिकेत साहिल यांनी आरोप केला आहे - कंगना रनोट गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडचा घराणेशाही आणि फेवरेटिज्मचे केंद्र म्हणून सतत अपमान करत आहे. तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून आणि टीव्ही मुलाखतींद्वारे ती हिंदू आणि मुस्लिम कलाकारांमध्ये मतभेद निर्माण करत आहे. तिने समाजात तेढ निर्माण करणारे अत्यंत आक्षेपार्ह ट्विट केले आहेत, ज्यामुळे केवळ धार्मिक भावनाच दुखावल्या गेल्या नाहीत तर इंडस्ट्रीतील कलाकारही दुखावले गेले आहेत.

साहिल यांनी पुरावे म्हणून कंगनाचे अनेक ट्विट कोर्टासमोर सादर केले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, सबळ पुरावे मिळाल्यास दोघी बहिणींना अटक देखील होण्याची शक्यता आहे.

या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

वांद्रे येथील महानगर न्यायदंडाधिकारी जयदेव वाय घुले यांनी सीआरपीसीच्या कलम 156 (3) अन्वये एफआयआर नोंदवून कंगनाविरोधात चौकशीचे आदेश दिले होते. यावर कारवाई करत पोलिसांनी कंगना आणि तिच्या बहिणीविरूद्ध कलम 153 A, 295 A, 124 A आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...