आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगनासमोर आणखी एक अडचण:पंजाबच्या 73 वर्षीय वृद्ध महिलेने अभिनेत्रीविरोधात दाखल केला मानहानीचा खटला, कंगना म्हणाली होती - या 100-100 रुपयांमध्ये आंदोलनात सहभागी होतात

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिवसेंदिवस कंगनाच्या अडचणीत वाढ होताना दिसतेय.

अभिनेत्री कंगना रनोट हिला तिने केलेले एक वक्तव्य भोवले आहे. आधीच कायदेशीर अडचणीत अडकलेल्या कंगनाविरोधात आता बठिंडा (पंजाब) येथे मानहानीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. 73 वर्षीय मोहिंदर कौर यांनी ही तक्रार दाखल आहे. शेतकरी आंदोलनाच्या वेळी कंगनाने मोहिंदर कौर यांची तुलना दिल्लीतील शाहीन बाग आंदोलनात सहभागी होणा-या 90 वर्षीय बिलकीस दादीसोबत केली होती. कंगनाने दावा केला होता की, त्या 100 रुपयांसाठी प्रत्येक आंदोलनात सहभागी होत असतात. शुक्रवारी मोहिंदर कौर यांचे वकील रघबीर सिंग यांनी सांगितल्यानुसार, कंगनाविरोधात आयपीसीच्या कलम 499 (मानहानी) आणि 500 (मानहानीची शिक्षा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 11 जानेवारी रोजी कोर्टात यावर सुनावणी होईल.

'मानसिक त्रास सहन करावा लागला'
तक्रारीत मोहिंदर कौर म्हणाल्या, 'अभिनेत्रीने ट्विटमध्ये माझी तुलना दुस-या महिलेसोबत करुन माझ्यावर खोटे आरोप लावले आहेत. तिने शाहीन बाग आंदोलनात सहभागी झालेली दादी मी असल्याचा दावा केला. असे वक्तव्य करुन कंगनाने माझी विश्वासार्हता आणि प्रतिमा मलीन केली आहे,' असे कौर म्हणाल्या.

त्यांनी पुढे सांगितल्यानुसार, 'कंगनाच्या त्या ट्विटमुळे मला कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, शेजारी, ग्रामस्थ आणि सामान्य लोकांकडून मानसिक ताण, वेदना, त्रास सहन करावा लागला. असे असूनही कंगनाने माफी मागण्याची साधी तसदीही घेतली नाही.'

कंगनाने आपल्या पोस्टमध्ये काय लिहिले होते?
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात अनेक वृद्ध शेतकरी आणि त्यांची कुटुंबे सामील झाली आहेत. यात सामील एक वर्षीय वृद्ध महिला, ज्यांना सगळे ‘दादी’ म्हणत आहेत, त्यांच्यावरच कंगनाने टीका केली होती. कंगनाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, ‘हा..हा..हा.. या त्याच दादी आहेत, ज्यांना टाईम मॅगझिनने सर्वात शक्तिशाली व्यक्तींमध्ये सामील केले आहे. या आता 100 रुपयांत उपलब्ध आहेत. पाकिस्तानी पत्रकार भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कुप्रसिद्धी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला असे लोक हवे आहेत, जे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्यासाठी आवाज उठवू शकतील.’ या पोस्टनंतर तिच्यावर प्रचंड टीका झाली होती. सदर प्रकार लक्षात आल्यावर कंगनाने आपले ट्विट डिलीट केले होते.

मोहिंदर कौर यांनी दिले होते प्रत्युत्तर

बठिंडाच्या बहादूरगज जांदियां गावातील मोहिंदर कौर यांची 13 एकर जमीन आहे. कंगनाने मोहिंदर कौर यांच्या बाबतीत 100-100 रुपयांमध्ये आंदोलनात सहभागी झाल्याचे म्हटल्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या होत्या की, "मला कोणीतरी सांगितले की कोणत्या तरी अभिनेत्रीने माझ्याबाबत असे लिहिले आहे. ती कधीही माझ्या घरी आलेली नाही. मी काय करते हे तिला माहित नाही आणि ती सांगते की 100 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ही अतिशय वाईट गोष्ट आहे, 100 रुपयांचे मला काय करायचे आहे? कंगना म्हणतेय की 100 रुपयांमध्ये आंदोलनासाठी महिला मिळातात. मी तिला 600-700 रुपये देते, तिने कापसाची एक गोणी उचलून दाखवावी. काहीही बोलते. ही तर मानसिक रोगी आहे. शेती काय असते हे तिला माहित तरी आहे का? शेतीत किती कमाई असते ते तरी तिला माहित आहे का? उन्हात, रात्री बेरात्री शेतात घाम गाळल्यावर पैस मिळतात. शेतीत पैसे कमावणे खूप कठीण असते. कंगनाने आपली भाषा तरी सांभाळावी, काय बोलतोय याचा विचार करावा. कोणाविषयी वाईट बोलण्यापूर्वी एकदा विचार करावा. कोणाविषयी चांगला विचार करायचा नसेल तर ठीक पण वाईटही विचार करु नये. तिने सगळ्यांसाठी देवाकडे प्रार्थना करावी," अशा शब्दांत त्यांनी कंगनाला सुनावले होते.

मोहिंदर कौर यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. तिन्ही मुलींची लग्न झाली असून मुलगा पत्नी आणि मुलांसह मोहिंदर यांच्यासोबत राहतो. मोहिंदर कौर आपल्या घरासाठी स्वत: भाज्या पिकवतात आणि आपल्या शेतीची काळजी स्वत:च घेतात.

बातम्या आणखी आहेत...