आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगना रनोटवर चोरीचा आरोप:'मणिकर्णिका रिटर्न्स'च्या घोषणेच्या काही तासांतच वादात अडकली कंगना, लेखक आशिष कौल यांनी लावला कथा चोरीचा आरोप

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाने कथा चोरी करत चित्रपटाची घोषणा केली असल्याचा तिच्यावर आरोप आहे.

अभिनेत्री कंगना रनोटने गुरुवारी मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर आपल्या आगामी 'मणिकर्णिका रिटर्न्स: द लीजेंड ऑफ दिड्डा' या चित्रपटाची घोषणा केली. मात्र या घोषणेनंतर काही तासांतच ती वादात सापडली. दिड्डा यांचे चरित्र लिहिणारे लेखक आशिष कौल यांनी कंगनावर आपली कथा चोरी केल्याचा आरोप केला आहे. कौल यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्यांनी कंगनाला आपल्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिण्यासाठी मेल केला होता, मात्र आता तिने कथा चोरी करत चित्रपटाची घोषणा केली.

म्हणून कंगनाकडून प्रस्तावना लिहून घेणार होते...
एनबीटीशी झालेल्या संभाषणात कौल म्हणाले की, कंगनाने आपल्या पुस्तकाची प्रस्तावना लिहावी, अशी त्यांची इच्छा होती. कारण देशात सध्या तिची प्रतिमा सतत आपल्या हक्कांसाठी लढा देणारी आणि अन्यायाला वाचा फोडणारी अशी आहे.

कथा चोरीला बौद्धिक चोरी म्हटले
कौल यांनी सांगितल्यानुसार, त्यांना कंगनाची कथा चोरी करण्याची ही शैली समजली नाही. कारण लोक तिला सत्याची साथ देणारी महिला म्हणून ओळखतात. त्यांनी कंगनाच्या या चोरीचे बौद्धिक चोरी म्हणून वर्णन केले आहे.

कंगनाने मेलला कधीही प्रतिसाद दिला नाही
कौल यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेसाठी कंगनाला अनेकदा मेल केले. पण तिने त्यांना उत्तर दिले नाही. सोशल मीडियावरसुद्धा त्यांनी आपल्या पुस्तकासंदर्भात कंगनाला बर्‍याच वेळा टॅग केले. आता मात्र तिने कथा चोरी करून त्यांच्या हक्कांचे उल्लंघन केले, असे कौल यांनी म्हटले आहे.

रिलायन्ससोबत चित्रपटाची योजना आखत आहेत
कौल यांनी सांगितल्यानुसार, 'दिद्दा द वॉरियर क्वीन ऑफ काश्मीर' हे पुस्तक त्यांनी चित्रपटाच्या पटकथेसारखे लिहिले आहे. ते रिलायन्स एंटरटेनमेंट सोबत मिळून या विषयावर बिग बजेट चित्रपटाचीही योजना आखत आहेत. कोरोनामुळे त्यांचे या प्रोजेक्टवर काम पुढे जाऊ शकले नाही. पण या कथेसंबंधी त्यांची प्रॉडक्शन हाऊसशी बोलणी सुरु आहेत.

कंगनाने गुरुवारी केली घोषणा
कंगना सध्या आपल्या आगामी ‘धाकड’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. गुरुवारी तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून 2018 मध्ये रिलीज झालेला ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’चा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आणत असल्याची घोषणा केली होती. तिच्या या आगामी चित्रपटाचे नाव ‘मणिकर्णिका रिटर्न्स: द लीजेंड ऑफ दिद्दा’ असेल. या चित्रपटाची निर्मितीदेखील ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’चे निर्माते कमल जैन करणार आहेत.

काश्मीरची शूर राणी म्हणून ओळखली जाते दिद्दा
खरं तर, राणी दिद्दा अविभाजित काश्मीरची शूर राणी म्हणून ओळखली जाते. एका पायाने अपंग असूनही त्यांनी दोनदा युद्धात मुघल आक्रमक मेहमूद गझनवीचा पराभव केला होता. ती अजूनही धाडसी वीरांगना म्हणून ओळखली जाते.

या चित्रपटासंदर्भात कंगना म्हणते, तिच्या उर्वरित चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतरच मी ‘मणिकर्णिका रिटर्न्स: द लीजेंड ऑफ दिड्डा’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करेल. सूत्रानुसार, कंगना या चित्रपटाचे शूटिंग जानेवारी 2022 मध्ये सुरू करणार आहे.कंगना आणि कमल जैनने गेल्या आठवड्यातच चित्रपटाची फायनल स्क्रिप्ट तयार केली आहे. हा चित्रपट मागील चित्रपटापेक्षा भव्य आणि मोठ्या बजेटचा असेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वत: कंगना करणार आहे, की दुसरे काेणी करणार हे अजून ठरले नाही. सध्या ती आपले बाकीचे काम पूर्ण करत आहे.

बातम्या आणखी आहेत...