आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली महिला आयोगाची मागणी:कंगनाला 'सत्तेची गुलामगिरी' देशाचं खरं स्वातंत्र्य वाटतंय, राष्ट्रपतींना पत्र लिहून म्हटले - तिच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा

दिल्ली महिला आयोगाने (DCW) अभिनेत्री कंगना रनोटच्या स्वातंत्र्याच्या विधानावर विरोध दर्शवला आहे. आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना पत्र लिहून कंगनाचा पद्मश्री पुरस्कार काढून घेण्याची आणि यासह तिच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

कंगनाने एका टीव्ही चॅनलवर देशाच्या स्वातंत्र्यावर वादग्रस्त विधान केले होते. भारताला 2014 मध्ये 'खरे स्वातंत्र्य' मिळाले आणि 1947 मध्ये देशाला 'भिक मागून' स्वातंत्र्य मिळाले, असे वादग्रस्त वक्तव्य तिने केले होते.

तिला सत्तेची गुलामगिरी हेच देशाचे खरे स्वातंत्र्य वाटत आहे
कंगना रनोट हिने आपल्या वक्तव्याने देशातील स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केल्याचे मालीवाल यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे. त्या म्हणाल्या, भगत सिंग, महात्मा गांधी यांसारख्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांबद्दल तिच्या मनात किती द्वेष आहे, हे तिच्या या विधानांवरून दिसून येते. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळे आपल्याला ब्रिटीश राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले हे आपण सर्व जाणतो. कंगनाला 'सत्तेची गुलामगिरी' हेच देशाचे खरे स्वातंत्र्य वाटत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा
स्वाती मालिवाल यांनी ट्वीटमध्ये म्हटले, 'कंगना रनोट ही अशी महिला आहे जिला गांधी भगतसिंग यांचे हौतात्म्य विनोद वाटतो आणि कोट्यवधी लोकांच्या बलिदानाने मिळालेले स्वातंत्र्य, जणू भीक मागितल्यासारखे वाटते! तिला पुरस्काराची नव्हे तर उपचाराची गरज आहे! मी राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे की रनोट हिचा पद्मश्री परत घेतल्यानंतर तिच्यावर देशद्रोहाची तक्रार दाखल करण्यात यावी.'

कंगना रनोट ही द्वेष आणि असहिष्णुतेची एजंट आहे

महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आणि अभिनेत्रीला द्वेषाची एजंट म्हटले. त्यांनी लिहिले की, पद्मश्री कंगना रनोट ही द्वेष आणि असहिष्णुतेची एजंट आहे. 2014 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले असे तिला वाटते, यात नवल नाही. द्वेष, असहिष्णुता, आणि दडपशाहीला 2014 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले.

बातम्या आणखी आहेत...