आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

96 कोटींपेक्षा जास्त संपत्तीची मालकीण आहे कंगना:बॉलिवूडची सर्वात महागडी अभिनेत्री आहे कंगना रनोट, तिच्यावर पणाला लागले आहेत इंडस्ट्रीचे 250 कोटी रुपये

लेखक: गगन गुर्जर8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
2019 मध्ये फोर्ब्स मासिकाने कंगनाच्या वार्षिक कमाईची नोंद 17 कोटी रुपये केली होती.  त्यावर तिची थोरली बहीण रंगोली चंदेल संतापली होती. तिने आपल्या एका ट्विटमध्ये लिहिले होते की, फोर्ब्सने जितकी कंगनाची कमाई सांगितली आहे, त्यापेक्षा जास्त ती कर भरते. - Divya Marathi
2019 मध्ये फोर्ब्स मासिकाने कंगनाच्या वार्षिक कमाईची नोंद 17 कोटी रुपये केली होती.  त्यावर तिची थोरली बहीण रंगोली चंदेल संतापली होती. तिने आपल्या एका ट्विटमध्ये लिहिले होते की, फोर्ब्सने जितकी कंगनाची कमाई सांगितली आहे, त्यापेक्षा जास्त ती कर भरते.
  • कंगना 96 कोटींहून अधिकच्या संपत्तीची मालकीण आहे. एकेकाळी एक बेडरुमच्या फ्लॅटमध्ये राहायची.
  • कंगना ही बॉलिवूडची सर्वात महागडी अभिनेत्री आहे, चित्रपटांसाठी ची जवळजवळ 17-18 कोटी रुपये मानधन घेते.

मुंबईची पाकव्याप्त काश्मीरसोबत तुलना केल्याने आणि बॉलिवूडला ड्रग्ज प्रकरणात ओढल्यामुळे अभिनेत्री कंगना रनोट सतत वादात आहे. सध्या ती मनालीत आहे. मात्र तिला परतून मुंबईतच यायचे आहे. कारण ही तिची कर्मभूमी आहे. तिचे 'तेजस', 'धाकड', 'थलायवी' आणि 'इमली' हे 4 चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. व्यापार विश्लेषक अतुल मोहन यांच्या म्हणण्यानुसार, कंगनाच्या प्रत्येक चित्रपटाचे सरासरी बजेट (कंगनाची फी, मेकिंग, मार्केटिंग या सर्वांचा समावेश) 60-70 कोटींवर पोहचते. त्यानुसार कंगनावर बॉलिवूडचे सुमारे 250-300 कोटी रुपये पणाला लागले आहेत.

  • वादाचा काय परिणाम होऊ शकतो

शिवसेनेबरोबर झालेल्या वादामुळे महाराष्ट्रात कंगनाच्या चित्रपटांना विरोध होऊ शकतो, पण बॉलिवूडसोबतच्या वादाचा फारसा परिणाम तिच्या चित्रपटांवर होणार नाही. अतुल मोहन म्हणतात, "कंगना रनोटने आधीच स्पष्ट केले होते की, मोठे प्रॉडक्शन हाऊस तिला काम देणार नाहीत. म्हणून तिने स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस सुरू केले. ती सर्वकाही स्वबळावर करत आहे. ती कोणावरही अवलंबून नाही."

हा फोटो यावर्षी जानेवारीतील आहे. त्यावेळी कंगनाने तिचे ऑफिस मणिकर्णिका फिल्म्समध्ये सर्वप्रथम पूजा केली. काही महिन्यांपूर्वी तिने आपल्या प्रॉडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट 'अपराजित अयोध्या'च्या निर्मितीची घोषणा केली होती.
हा फोटो यावर्षी जानेवारीतील आहे. त्यावेळी कंगनाने तिचे ऑफिस मणिकर्णिका फिल्म्समध्ये सर्वप्रथम पूजा केली. काही महिन्यांपूर्वी तिने आपल्या प्रॉडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट 'अपराजित अयोध्या'च्या निर्मितीची घोषणा केली होती.
  • कंगना रनोटची संपत्ती किती आहे?

कंगनाच्या एकूण मालमत्तेबद्दल बोलायचे झाले तर तिची संपत्ती 96 कोटींपेक्षा जास्त आहे. यात तिच्या तीन घरे आणि दोन कारचा समावेश आहे. तिच्या उत्पन्नाचे माध्यम चित्रपट आणि ब्रँड एंडोर्समेंट आहे.

  • कंगना ही बॉलिवूडची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे

कंगना रनोट ही बॉलिवूडची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. व्यापार विश्लेषक अतुल मोहन यांच्या म्हणण्यानुसार, कंगना एका चित्रपटासाठी सरासरी 17-18 कोटी रुपये घेते. 'धाकड' या आगामी चित्रपटासाठी तिने सुमारे 21 कोटी रुपये घेतले आहेत. त्याचबरोबर तिने जयललिता यांचा बायोपिक ‘थलायवी’साठी सुमारे 21-22 कोटी रुपये घेतले आहे. कंगनानंतर दीपिका पदुकोण बॉलिवूडची सर्वात महाग अभिनेत्री आहे. एका चित्रपटासाठी ती 11-12 कोटी घेते.

  • ब्रँड एंडोर्समेंटसाठी 3-8 कोटी

अतुल मोहन यांच्या म्हणण्यानुसार, मोठ्या स्टार्सना ब्रँड प्रमोशनसाठी वर्षाकाठी 3-8 कोटी रुपये मिळतात. कंगना ही बॉलिवूडची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. अशा परिस्थितीत ती उर्वरित अभिनेत्रींपेक्षा जाहिरातींसाठी नक्कीच जास्त पैसे घेत असावी. 2019-20 च्या अहवालानुसार, आदित्य बिर्ला समूहाच्या लिवा, सिग्नेचर मास्टरपीस-डिएगो, इमामी बोरोप्लास, खादिम आणि फॅशन डिझायनर अनिता डोगरे यांच्या ग्लोबल देसीची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून कंगनाने काम केले आहे.

  • कंगनाची तीन घरे
2013 मध्ये पहिले घर विकत घेतले
2013 मध्ये पहिले घर विकत घेतले

मार्च 2013 मध्ये कंगनाने खार वेस्टच्या ऑर्किड ब्रीज नावाच्या इमारतीत तीन फ्लॅट विकत घेतले होते. फ्लॅट नंबर 501, 502 आणि 503 चा एरिया क्रमशः 797, 711 आणि 459 चौरस फूट आहेत. या तीन फ्लॅटसाठी कंगनाने अनुक्रमे 5.50 कोटी, 5.25 कोटी आणि 3.25 कोटी रुपये दिले आहेत. तिन्ही फ्लॅटची एकूण किंमत 14 कोटी रुपये आहे.

2017 मध्ये मुंबईत बंगला विकत घेतला.
2017 मध्ये मुंबईत बंगला विकत घेतला.

कंगना रनोटने 2017 मध्ये पाली हिलस्थित तीन मजली इमारत विकत घेतली होती. वृत्तानुसार तिने यासाठी 20 कोटी दिले होते. या इमारतीचे रुपांतर कंगनाने आपल्या ऑफिस कम स्टुडिओत केले. ज्याचे नाव तिने मणिकर्णिका फिल्म्स असे ठेवले आहे. कंगनाने त्याच्या खरेदीपासून बांधकामापर्यंत 48 कोटी रुपये खर्च केले.

मनालीमध्ये 8 बेडरूमचा बंगला.
मनालीमध्ये 8 बेडरूमचा बंगला.

कंगना रनोटच्या मनालीतील बंगल्याचा बाजारभाव सुमारे 30 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. रिपोर्ट्सनुसार, 8 बेडरूमचा हा बंगला कंगनाने 10 कोटींमध्ये खरेदी केला होता. उर्वरित 20 कोटी रुपये तिने पुन्हा बांधण्यात खर्च केले आहेत. हा बंगला तिने 2018 च्या सुरुवातीस खरेदी केला होता.

  • कंगनाच्या दोन गाड्या
वयाच्या 21 व्या वर्षी पहिली कार विकत घेतली.
वयाच्या 21 व्या वर्षी पहिली कार विकत घेतली.

कंगनाने वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी आपली पहिली कार विकत घेतली होती. बीएमडब्ल्यू 7- सीरिजची ही पहिली कार होती. 2008 मध्ये खरेदी केलेल्या या कारची एक्स-शोरूम किंमत आजच्या तारखेला 1.35 कोटी ते 2.44 कोटी रुपये आहे. त्यानुसार 2008 मध्ये त्याचे बाजार मुल्य कमी असेल.

2019 मध्ये दुसरी कार खरेदी केली.
2019 मध्ये दुसरी कार खरेदी केली.

कंगनाने तिची दुसरी कार 2019 मध्ये 'जजमेंटल है क्या' या चित्रपटाच्या रिलीजनंतर खरेदी केली होती. मनालीस्थित घरासाठी खरेदी केलेल्या मर्सिडीज बेंझ जीएलई-क्लास एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 73.7 लाख ते 1.25 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे.

बातम्या आणखी आहेत...