आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'क्वीन'चा बदलेला सूर:कंगना रनोटने चक्क केले 'गंगूबाई काठियावाडी'चे कौतुक; म्हणाली- चित्रपट माफियांकडून चांगल्याची अपेक्षा नव्हती, पण त्यांचे काम कौतुकास्पद आहे

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाने केले कौतुक

अभिनेत्री कंगना रनोट पहिल्या दिवसापासून आलिया भट्ट स्टारर 'गंगूबाई काठियावाडी'ला टार्गेट करत आहे. विशेष म्हणजे आलियाचा हा चित्रपट प्रदर्शित झाला असून कंगनाचा तिच्याबाबतचा दृष्टिकोन बदलला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने लिहिले की, चित्रपट माफियांकडून चांगल्याची अपेक्षा नव्हती, पण त्यांचे काम कौतुकास्पद आहे.

कंगनाने केले कौतुक
कंगनाने तिच्या सोशल मीडिया पोस्टवर लिहिले, 'दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने चित्रपटगृहांना पुनरुज्जीवन दिल्याचे ऐकून खूप आनंद झाला. हिंदी पट्ट्यातही छोटी पावले उचलली जात आहे. अलीकडील एक महिला केंद्रित चित्रपटात एक मोठा नायक आणि एक सुपरस्टार दिग्दर्शक आहे. ही त्यांची छोटी पावले असतील, पण ती क्षुल्लक नाहीत. सध्या व्हेंटिलेटरवर असलेल्या चित्रपटगृहांसाठी हे छोटे पाऊल संजीवनी ठरणारे आहे. चित्रपट माफिया प्रसंगी काहीतरी चांगले करतील, अशी मला कधीच अपेक्षा नव्हती. जर त्यांनी असे केले तर आम्ही त्यांचे कौतुक करु. चला चांगल्यासाठी आशा करुया.'

प्रमोशनवर कंगनाने साधला होता निशाणा
कंगनाने आलियाच्या चित्रपटाच्या प्रमोशनवर निशाणा साधला होता. कंगनाने एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये एक छोटी मुलगी आलियाची नक्कल करताना दिसत आहे. यावर आक्षेप घेत कंगनाने लिहिले होते, 'ही लहान मुलगी तोंडात विडी घेऊन असे अश्लिल संवाद बोलतेय, तिने अशाप्रकारे एका सेक्स वर्करची नक्कल करणे योग्य आहे का? तिचे हावभाव पाहिलेत का? या वयात तिच्या चेहऱ्यावर अशाप्रकारचे हावभाव शोभा देतात का? या प्रकारे अशा बऱ्याच मुलांचा वापर केला जात आहे.’

कंगना म्हणाली होती - शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा चुराडा होणार आहे
इतकेच नाही तर कंगनाने सोशल मीडिया स्टोरीच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे करण जोहरला चित्रपट माफिया डॅडी आणि आलियाला बिम्बो म्हणून संबोधले होते, "या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा चुराडा होईल.... पापा (चित्रपट माफिया डॅडी) की परी (जिच्याकडे ब्रिटिश पासपोर्ट आहे) कारण पापा हे सिद्ध करू इच्छितात की रोमकॉम बिम्बो अभिनय करू शकते... चित्रपटातील सर्वात मोठी चुकीची गोष्ट म्हणजे त्याची कास्टिंग... आता त्यात सुधारणा होणार नाही, त्यामुळे चित्रपटगृहे आता फक्त दाक्षिणात्य आणि हॉलिवूड चित्रपटांकडे वळत आहेत. जोपर्यंत चित्रपट माफियांची सत्ता आहे तोपर्यंत बॉलिवूडच्या नशिबात हेच आहे," असे म्हणत कंगनाने आलिया भट्टवर निशाणा साधला होता.

बातम्या आणखी आहेत...