आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगनाची संतप्त प्रतिक्रिया:आलिया भट्टच्या चित्रपटाच्या प्रमोशनवरुन कंगना रनोट संतापली, गंगूबाई आणि पं. नेहरूंबाबत केले आक्षेपार्ह वक्तव्य

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काय म्हणाली कंगना रनोट?

कंगना रनोट नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. अलीकडेच तिने आलिया भट्टच्या आगामी 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाच्या प्रमोशनवरुन टीका केली आहे. आलियाच्या चित्रपटातील एक डायलॉग म्हणतानाचा एका लहान मुलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर कंगनाने तिची प्रतिक्रिया दिली आहे. याआधी अभिनेत्रीने दीपिका पदुकोणच्या 'गहराइंया' या चित्रपटावरही आपली प्रतिक्रिया दिली होती आणि चित्रपटाच्या नावावर कचरा विकू नका, असे म्हटले होते.

सरकारने पालकांवर कारवाई करावी : कंगना
याबद्दल बोलताना कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, ‘सरकारने अशा सर्व पालकांच्या विरोधात कारवाई केली पाहिजे जे आपल्या मुलांकडून अशाप्रकारे व्हिडिओ बनवून चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. एक प्रसिद्ध वेश्या आणि तिच्या दलालाचा हा बायोपिक आहे. जी आपली ताकद वाढवण्यासाठी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना मुली पुरवण्याचे काम करत होती. अशाप्रकारे अल्पवयीन मुलांकडून व्हिडिओ बनवून त्यातून पैसा कमावणाऱ्या पालकांवर कारवाई करायला हवी. माननीय माहिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणीजी आपण याकडे लक्ष द्या.’

शेकडो मुलांचा वापर होत आहे
या व्हायरल व्हिडिओबाबत कंगनाने पुढे लिहिले, 'ही लहान मुलगी तोंडात विडी घेऊन असे अश्लिल संवाद बोलतेय, तिने अशाप्रकारे एका सेक्स वर्करची नक्कल करणे योग्य आहे का? तिचे हावभाव पाहिलेत का? या वयात तिच्या चेहऱ्यावर अशाप्रकारचे हावभाव शोभा देतात का? या प्रकारे अशा बऱ्याच मुलांचा वापर केला जात आहे.’

व्हायरल व्हिडिओ
या व्हायरल व्हिडिओवरून कंगनाने गंगूबाई काठियावाडीवर निशाणा साधला आहे. व्हिडिओ पहा

25 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे चित्रपट
आलिया भट्ट स्टारर 'गंगुबाई काठियावाडी' 25 फेब्रुवारीला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. याचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि विजय राज देखील दिसणार आहेत. हा चित्रपट हुसैन झैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकातील एका चॅप्टरवर आधारित आहे ज्यात कामाठीपुराची माफिया गंगूबाईबद्दल सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...