आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगना-उर्मिला वाद:उर्मिला मातोंडकरला अभिनयासाठी नाही तर सॉफ्ट पॉर्नसाठी ओळखले जाते! मुलाखतीमध्ये कंगना रनोटची जीभ घसरली; तिकीट मिळण्याची वर्तवली शक्यता

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेत्री कंगना रनोेटने एका मुलाखतीत उर्मिला मातोंडकरविषयी जहरी टीका केली आहे.
  • कंगनाने उर्मिलाचा उल्लेख सॉफ्ट पॉर्नस्टार असा केला आहे.

अभिनेत्री कंगना रनोट हिने आता उर्मिला मातोंडकरविषयी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. पण यावेळी कंगनाने केलेली टीका ही अत्यंत खालच्या पातळीवरची असल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहे. उर्मिला अभिनयासाठी ओळखली जात नाही, ती ‘सॉफ्ट पॉर्नस्टार’ असल्याची टीका कंगनाने केली होती.

नुकत्यात टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने उर्मिताविषयी जहरी टीका करताना म्हटले, 'उर्मिला मातोंडकर… ती सॉफ्ट पॉर्नस्टार आहे. मला माहित आहे की हे अत्यंत निंदनीय आहे. पण ती निश्चितच तिच्या अभिनयासाठी परिचित नाही. उर्मिला मातोंडकर कशासाठी ओळखली जाते? सॉफ्ट पॉर्नसाठी… बरोबर ना? जर तिला तिकीट मिळू शकतं, तर मला (तिकीट) का नाही मिळणार?', असे वक्तव्य कंगनाने केले आहे. उर्मिला मातोंडकर यांनी संपूर्ण मुलाखतीत आपल्या संघर्षाचा अवमना केल्याचा दावाही कंगनाने केला.

  • काय आहे संपूर्ण प्रकरण?

उर्मिला मातोंडकरने सपा राज्यसभा खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला होता. जया बच्चन म्हणाल्या होत्या की, जे इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत तेच इंडस्ट्रीची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत आहेत. जया बच्चन यांनी अभिनेता आणि भाजप खासदार रवी किशन यांच्यावर निशाणा साधत हे वक्तव्य केले होते. रवी किशन म्हणाले होते की, चीन आणि पाकिस्तानातून भारतातीतल तरुणाईला संपवण्यासाठी ड्रग आणले जात आहे आणि फिल्म इंडस्ट्री देखील अमली पदार्थ सेवनाच्या आहारी गेली आहे.

कंगनाने देखील असा दावा केला आहे की, 99 टक्के फिल्म स्टार्स हे ड्रग्जच्या अधीन आहेत. यावर उत्तर देताना उर्मिला मातोंडकरने अलीकडेच इंडिया टुडेच्या मुलाखतीत म्हटले होते की, 'संपूर्ण देश ड्रग्जच्या विळख्यात आहे. हिमाचल प्रदेश हे ड्रग्जचे उगमस्थान असल्याची तिला (कंगना) कल्पना आहे का? तिने स्वतःच्या राज्यातून सुरुवात केली पाहिजे.'

उर्मिला पुढे म्हणाली होती, 'क्या उखाड दोगे, किसके बाप का राज है, अशी भाषा कोणती सुसंस्कृत मुलगी वापरते? तिच्या ऑफिसवर झालेली कारवाई निंदनीयच आहे, त्याला माझा पाठिंबा नाही. पण तिला पुरवलेली वाय प्लस सुरक्षा आमच्याच पैशातून आहे. भाजपकडून निवडणुकीची उमेदवारी मिळवण्यासाठी ती त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे.'

ड्रग्जचे सेवन करणाऱ्या बॉलिवूडमधील कलाकारांची नावे जाहीर करण्याची मागणी उर्मिलाने कंगनाकडे केली होती. 'नावे कुठे आहेत? माझी इच्छा आहे की कंगनाने प्रत्यक्षात पुढे यावे आणि त्या सर्वांचे नाव घेऊन इंडस्ट्रीला मदत करावी', असेही ती म्हणाली होती.

  • उर्मिलाच्या समर्थनार्थ उतरले बॉलिवूड सेलेब्स

कंगनाच्या जहरी वक्तव्यानंतर दिग्दर्शक अनुभव सिन्हा, अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी उर्मिला मातोंडकरला पाठिंबा दर्शवला आहे.

स्वरा भास्करने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, "प्रिय उर्मिला मातोंडकर जी तुम्ही 'मौसम', 'चमत्कार', 'रंगीला', 'जुदाई', 'दौड', 'सत्या', 'भूत', 'कौन', 'जंगल', 'प्यार तूने क्या किया', 'तेजाब', 'पिंजर', 'एक हसीना थी' या चित्रपटांमधील उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखल्या जातात आणि आपण उत्तम अभिनय आणि सुंदर नृत्य केले आहे."

त्याचप्रमाणे, दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी लिहिले, "आपण सर्वात सुंदर, मोहक, सात्विक, बोलक्या अभिनेत्री आहात."

  • मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हटल्यानंतरही उर्मिलाने कंगनाला सुनावले होते

याआधी कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. तेव्हाही उर्मिलाने कंगनाला चांगले सुनावले होते. 'मुंबई लाखो भारतीयांचे पोट भरते आणि त्यांना नाव-प्रसिद्धी देते, केवळ कृतघ्नच तिची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करु शकतात', असे ट्विट तिने केले होते.