आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिल्मफेअर अवॉर्ड्सवर भडकली कंगना रनोट:कंगना म्हणाली - यावर्षी त्यांना पुरस्कार देण्यात आला ज्यांनी शेतक-यांना प्रजासत्ताक दिनी दंगली करण्यास उद्युक्त केले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तापसीला मिळाला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

नुकत्याच जाहीर झालेल्या फिल्मफेअर पुरस्कारांबद्दल कंगना रनोटने संताप व्यक्त केला आहे. तिने लिहिले, "गेल्या वर्षी इलायची पुरस्काराच्या रणनीतीनुसार 'नंगा ही तो आया है, घंटा लेकर जायगा' (चित्रपट 'गली बॉय') ला पुरस्कार देण्यात आला होता. यावर्षी सर्व इलायची अवॉर्ड ज्यांनी दिल्लीमध्ये दंगली भडकावल्या आणि प्रजासत्ताक दिनी दंगलीसाठी शेतक-यांना उद्युक्त केले त्यांना देण्यात आले. ते या इलायचीसाठी पात्र आहेत."

कमेंट पाहून सोशल मीडिया यूजर्सनाही सुनावले खडे बोल
कंगनाच्या या पोस्टवर कमेंट करताना एका यूजरने तिच्या राष्ट्रीय पुरस्कारावर निशाणा साधला आणि म्हटले की, हा अवॉर्ड सरकारची वाहवाही करणा-यांना देण्यात आला आहे. त्यावर उत्तर म्हणून कंगनाने चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. कंगनाला 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' आणि 'पंगा'साठी राष्ट्रीय अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

तापसीला मिळाला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
तापसीला थप्पड या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला. या श्रेणीत 'छपाक'साठी दीपिका पदुकोण, 'गुंजन सक्सेना : द करगिल गर्ल'साठी जान्हवी कपूर, 'शकुंतला देवी'साठी विद्या बालन आणि 'पंगा'साठी कंगना रनोट यांना नामांकन मिळाले होते.
अवॉर्ड मिळाल्यानंतर तापसीने आपल्या भावना व्यक्त करताना कंगनाचे आभार मानले होते. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

'आम्हाला सगळ्यांना आणखी मेहनत करायला भाग पाडण्यासाठी कंगना तुझे आभार. तुझ्या अभिनयाची उंची दिवसेंदिवस अशीच वाढत राहो,' असे तापसी त्या व्हिडिओमध्ये म्हणाली होती. तापसीने कौतुक केल्यानंतर कंगनाने तिला उत्तर दिले होते. तापसीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर कंगना रनोटने म्हटले होते, “धन्यवाद तापसी, तू विमल फिल्मफेअर अवॉर्डसाठी पात्र आहेस. यावर तुझ्या इतका दुसऱ्या कोणाचा हक्क नाही.'

सोशल मीडियावर यूजर्स मात्र कंगनाच्या या उत्तराचा वेगवेगळा अर्थ लावत आहेत. काहींच्या मते कंगनाने आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला, तर काहींच्या मते, कंगनाने गोड शब्दांत तापसीवर निशाणा साधला आहे. कंगना आणि तापसी यांच्यात सोशल मीडियावर कायम तू तू मैं मैं बघायला मिळत असते.

बातम्या आणखी आहेत...