आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Kangana Ranaut Meets Rajnath Singh With The Team Of Tejas, Seeks His ‘blessings’ For The Film Kangana Ranaut Meets Rajnath Singh With The Team Of Tejas, Seeks His ‘blessings’ For The Film

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजनाथ सिंह यांच्यासोबत कंगनाची भेट:संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना भेटली कंगना रनोट, आगामी 'तेजस' या चित्रपटासाठी घेतले आशीर्वाद

अमित कर्णएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या चित्रपटात कंगना एअरफोर्स पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट हिने रविवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. यावेळी तिच्यासह आगामी 'तेजस' या चित्रपटाची संपूर्ण टीमही उपस्थित होती. कंगनाने राजनाथ सिंह यांच्यासोबतच्या भेटीची छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत.

कंगनाने फोटो शेअर करताना लिहिले, 'आज टीम तेजसने आदरणीय श्री. राजनाथ सिंह यांची भेट घेतली. आम्ही त्यांचा आशीर्वाद घेतला, सोबतच @IAF_MCC ला आमच्या चित्रपटाची स्क्रिप्ट दाखवली आणि त्यांच्याकडून परवानगी घेतली. जय हिंद.' अशा आशयाची पोस्ट कंगनाने शेअर केली.

का घेतली भेट?
दैनिक भास्करला कंगना आणि राजनाथ सिंह यांच्या या बैठकीविषयी काही माहिती मिळाली आहे. ही भेट मयंक मधुर यांनी घडवून आणली. मयंक हे राजनाथ सिंह यांचे निकटवर्तीय मानले जातात.

या भेटीविषयी मयंक मधुर म्हणाले, 'निर्मात्यांना चित्रपटाचे चित्रीकरण ख-या एअरफोर्स बेसवर जाऊन करायचे आहे. विशेषत: बंगळूरुमध्ये जिथे तेजस विमानाची निर्मिती झाली होती. बंगळुरुव्यतिरिक्त कंगना आणि मेकर्स यांनी दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधील हवाई दलाच्या तळांवर चित्रीकरणाच्या परवानगीसाठी अर्ज केला आहे. चित्रपटाच्या टीमला नवीन वर्षात शूटिंग करायचे असून त्यासाठी त्यांनी अर्ज केला आहे. कंगनाच्या पात्राचे नावही बहुतेक तेजस असे आहे.'

कंगना एअरफोर्सचा पायलट बनली आहे

तेजसचे दिग्दर्शन सर्वेश मेवारा करणार असून रॉनी स्क्रूवाला निर्माते आहेत. या चित्रपटात कंगना एअरफोर्स पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे.

पूर्ण झाले 'थलायवी'चे चित्रीकरण

गेला काही काळ कंगना 'थलायवी - द रिव्हॉल्युशनरी लीडर' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. शनिवारी कंगनाने ‘थलायवी’चे शूटिंग पूर्ण झाल्याची घोषणा केली. कंगनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रीकरण पूर्ण झाल्याची बातमी चाहत्यांना दिली. ‘..आणि चित्रपट पूर्ण झाला. आज आम्ही आमचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प ‘थलायवी’चे शूटिंग यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.’ असे म्हणत तिने चित्रपटाच्या संपूर्ण क्रूचे आभार मानले.

हा चित्रपट अभिनेत्री-राजकारणी दिवंगत जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषांमध्ये तो प्रदर्शित होईल. ए.एल. विजय दिग्दर्शित या चित्रपटाच्या रिलीजची तारीख 26 जून होती, मात्र लॉकडाऊनमुळे चित्रपटाचे शूटिंग रखडले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser