आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खास भेट:कंगना रनोटने घेतली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट, म्हणाली - पहिले आपल्याकडे उत्तर प्रदेशचे तपस्वी राजा श्रीरामचंद्र होते आणि आता योगी महाराज!

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाने सोशल मीडियावर शेअर केल्या खास पोस्ट

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट हिने शुक्रवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कंगनाला अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनावेळी वापरण्यात आलेले नाणे भेट म्हणून दिले आहे. कंगनाने या भेटीचे फोटो आणि व्हिडिओज सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. कंगना उत्तर प्रदेश सरकारच्या ODOP या महत्त्वाच्या मोहिमेची अॅम्बेसिडर झाली आहे. कंगना आणि योगी आदित्यानाथ यांच्या भेटीवेळी उत्तर प्रदेश सरकारकडूनच ही घोषणा करण्यात आली आहे.

कंगनाने सोशल मीडियावर शेअर केल्या खास पोस्ट

कंगनाने आपल्या पोस्टमध्ये योगी आदित्यनाथ यांच्यासोबत झालेल्या भेटीबद्दल म्हटले, 'उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथजी यांना भेटून आनंद झाला. ते अत्यंत चैतन्यशील, साधे आणि प्रेरणादायी आहेत. तरुण, ज्वलंत आणि या राष्ट्रीतील लोकप्रिय नेत्यांपैकी एक असलेल्या योगीजींना भेटणे म्हणजे भाग्य आहे.'

कंगनाने 'तेजस'च्या शूटिंगसाठी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
कंगनाने आपल्या दुस-या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, 'आमचा आगामी चित्रपट तेजसच्या चित्रीकरणास सहकार्य केल्याबद्दल उत्तर प्रदेश सरकारचे आभार. माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांच्या आगामी निवडणुकांसाठी शुभेच्छा. पहिले आपल्याकडे उत्तर प्रदेशचे तपस्वी राजा श्रीरामचंद्र होते आणि आता आपल्याकडे योगी आदित्यनाथ आहेत.' कंगनाने या पोस्टसह योगी आदित्यनाथ यांनी तिला रामजन्मभूमी पूजनावेळी वापरण्यात आलेल्या नाण्याचा फोटो शेअर केला आहे.

योगी आदित्यनाथ यांनी कंगनाला दिले एक नाणे
कंगनाने तिच्या तिसऱ्या पोस्टमध्ये लिहिले, "माननीय मुख्यमंत्री यांनी मला नाणे भेट दिले आहे, जे रामजन्मभूमी पूजनावेळी वापरण्यात आले होते. मी राम मंदिरावर अयोध्या नावाच्या एक चित्रपट बनवत आहे. हे एक चांगले शगुन आहे, ज्याला आपण आशीर्वाद म्हणतो. जय श्री राम."

'द इन्कार्नेशन सीता'मध्ये सीतेच्या भूमिकेत दिसणार कंगना

पुढील काही महिने कंगना 'धाकड', 'मणिकर्णिका रिटर्न्स: द लीजेंड ऑफ डिड्डा' आणि 'इमर्जन्सी' सारख्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असेल. 'तेजस'मध्ये कंगना एका महिला वैमानिकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याचबरोबर 'धाकड' मध्ये ती एका सीक्रेट एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय ती 'द इन्कार्नेशन सीता' या चित्रपटात माती सीतेची भूमिका साकारणार आहे. अलीकडेच या चित्रपटासाठी कंगनाच्या नावाची घोषणा झाली.

बातम्या आणखी आहेत...